esakal | ठेकेदारांची बिले देण्यासाठी निधी आणावा आणि नंतरच नवीन आश्‍वासने द्यावीत
sakal

बोलून बातमी शोधा

Parshuram Uparkar

ठेकेदारांची बिले देण्यासाठी निधी आणावा आणि नंतरच नवीन आश्‍वासने द्यावीत

sakal_logo
By
- प्रशांत हिंदळेकर

मालवण - जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागातंर्गत झालेल्या विकास कामांपैकी सुमारे 113 कोटी रुपयांचे ठेकेदारांचे बिल गेली दोन वर्षे रखडले आहे. अशा परिस्थितीत आमदार वैभव नाईक जनतेला नव्या विकास कामांबाबत खोटी आश्‍वासने देत सुटले आहेत. त्यांनी प्रथम रखडलेली ठेकेदारांची बिले देण्यासाठी निधी आणावा आणि नंतरच नवीन आश्‍वासने द्यावीत. अदृश्य विकासाचे खेळ त्यांनी थांबवावेत, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, माजी मनविसे जिल्हाअध्यक्ष अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, मनविसे तालुका अध्यक्ष विनायक गावडे, निखिल गावडे, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: बांदा : बेकायदा गोवा बनावटीची दारू जप्त

परप्रांतीयांच्या मुद्यावर भूमिका मांडताना श्री. उपरकर म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी परप्रांतीय कामगार, मजूरांचा सहभाग आहे. या सर्व परप्रांतीय कामगार, मजूरांची नोंद पोलिसांनी ठेवणे आवश्यक आहे. राज्यात, जिल्ह्यात जे मोठ मोठे गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाळू उपसा, हॉटेल तसेच अन्य ठिकाणी असणार्‍या परप्रांतीय कामगारांची नोंद पोलिस प्रशासनाने संबंधित ठेकेदार व मालकांमार्फत करावी. ज्या परप्रांतीयांची नोंद असणार नाही. त्यांच्यावर कारवाई करावी. यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर 22 सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यामध्ये परप्रांतीयांच्या नोंदीबाबत मनसेच्यावतीने निवेदन दिले जाणार आहे.``

ग्रामीण भागातील बहुतांश सर्वच रस्ते खड्डेमय बनले आहेत. सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. जिल्ह्यातील विकासकामांसाठी आमदार निधी आणला असल्याचे सांगत असल्याने या निधीतून कोणती विकासकामे होत आहेत हे मनसेचे कार्यकर्ते बॅटरी घेऊन शोध घेणार असल्याचा टोलाही श्री. उपरकर यांनी यावेळी लगावला.

loading image
go to top