esakal | पार्टटाईम जॉब आला अंगलट; तरुणाला पावणे दोन लाखाला गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

पार्टटाईम जॉब आला अंगलट; तरुणाला पावणे दोन लाखाला गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली - नोकरी नसल्याने अनेक तरूण ऑनलाइन जॉब (Online Job) शोधण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रयत्नात तालुक्यातील ग्रामीण भागातील एका तरुणाच्या बँक खात्यातील (Bank Account) तब्बल एक लाख ९० हजार लांबविल्याचे (Cheating) प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा सायबर क्राईम ब्रँचकडे ऑनलाइन तक्रातही दाखल झाली आहे.

एका कंपनीच्या नावाने महिन्याला तीन ते दहा हजार रुपये कमविण्याचा मेसेज आल्याने त्या तरुणाने एक ॲप डाऊनलोड केले. या ॲपच्या माध्यमातून रोजगार सुरू करण्यासाठी काही प्रमाणात रक्कमही पाठवली. त्याचा परतावा प्रथम तीनशे आणि एक हजार रुपये मिळाला; मात्र, त्यानंतर तरुणाच्या वेगवेगळ्या दोन बँक खात्यांमधील सुमारे एक लाख ६० हजाराची रक्कम गायब झाली. त्या प्रकारात तरुणाला सुमारे एक लाख ९० हजारला गंडा बसला आहे.

हेही वाचा: कणकवली : कोविड सेंटर बंद करून आरोग्याशी खेळ

बँकेशी संपर्क साधला आणि तक्रार केली. पोलिसांच्या ऑनलाईन सायबर पोर्टलवर ही तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार २५ ऑगस्टला पार्ट टाइम जॉब मिळविण्याच्या नादात झाला. ‘घरबसल्या महिन्याला दहा हजार कमवा’, असा मेसेज आला होता. त्यानुसार एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले.

व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला त्याच्याकडून एक हजार रुपये भरण्यात आले. याबदल्यात समोरच्या व्यक्तीने अडीच हजार रुपये त्या तरूणाच्या खात्यात जमा केले. त्यामुळे हा व्यवसाय चांगला आहे. अशी समज त्या तरूणाची झाली. त्यानंतर त्याच्याकडून ३० हजार रुपये व्यवसाय सुरू करण्यासाठी मागण्यात आले. तरूणाने ती रक्कम ऑनलाइन जमाही केली. ही रक्कम त्याने आपल्या ज्या दोन बँक खात्यांच्या माध्यमातून भरणा केली त्या दोन बँक खात्यामधून रविवारी (ता. २९) एक लाख साठ हजार रक्कम अचानक डेबीट झाल्याचा बँकेचा मेसेज आला. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा ओटीपी न मागता ही रक्कम ॲपच्या माध्यमातून काढली गेल्याने हा तरुण पुरता चक्रावून गेला.

loading image
go to top