
Mahagaon-Pali ST bus narrowly escapes tragedy after brake failure; driver hailed as hero.
Sakal
-अमित गवळे
पाली : सुधागड तालुक्यातील महागाव गावावरून शुक्रवारी (ता. 12) सकाळी 8.30 वाजता पालीकडे निघालेल्या एसटी बसचा (क्र. MH20 BL 3847) कवेळे आदिवासीवाडी जवळ वळण व उतारावर अचानक ब्रेक फेल झाला. यावेळी चालकाने प्रसंगावता दाखवत गाडी रस्त्याच्या बाजूला नेऊन थांबवली. त्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले. मात्र नादुरुस्त एसटी पुरवणाऱ्या परिवहन महामंडळावर प्रवाशांनी आक्रोश व्यक्त केला.