पाताळगंगा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

लक्ष्मण डूबे 
मंगळवार, 5 जून 2018

रसायनी (रायगड) - पाताळगंगा नदी कारखानदारीमुळे प्रदूषित झाली आहे. प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र पाताळगंगा नदीच्या जलप्रदूषणाचा प्रश्न अजुन सुटलेला नाही. क्षेत्रा बाहेरील व क्षेत्रातील काही कारखानदार चोरून प्रदूषित सांडपाणी नदीत सोडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तसेच आता नदीच्या मार्गावरील गावांतुन नागरी वसाहतीतील सांडपाणी सोडण्याचे प्रमाण वाढु लागल्याने नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अजुन गंभीर बनण्याची शक्यता आहे. तर नदी आता ठीक ठिकानी जलपर्णीचा विळखा वाढु लागला आहे. 

रसायनी (रायगड) - पाताळगंगा नदी कारखानदारीमुळे प्रदूषित झाली आहे. प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र पाताळगंगा नदीच्या जलप्रदूषणाचा प्रश्न अजुन सुटलेला नाही. क्षेत्रा बाहेरील व क्षेत्रातील काही कारखानदार चोरून प्रदूषित सांडपाणी नदीत सोडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तसेच आता नदीच्या मार्गावरील गावांतुन नागरी वसाहतीतील सांडपाणी सोडण्याचे प्रमाण वाढु लागल्याने नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अजुन गंभीर बनण्याची शक्यता आहे. तर नदी आता ठीक ठिकानी जलपर्णीचा विळखा वाढु लागला आहे. 

रसायनीत सुरवातीला एचओसी कंपनी व इतर कारखाने सुरू झाले. त्यानंतर काही वर्षानी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणि क्षेत्रा बाहेर एक मागुन एक अनेक कारखाने सुरू झाले. सुरवातीला कारखानदार कंपनीतीच ईटीपी केंद्रात प्रक्रिया करताना दुर्लक्ष करत असल्याने नदीचा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला, त्याचे विपरीत परिणाम नदी काठच्या गावातील नागरिकांच्या जीवनावर झाले. गावा जवळुन नदी जाते पण नदीचे पाणी वापरण्याची नदी काठच्या गावातील ग्रामस्थांनी धास्ती घेतली. ग्रामस्थांनी प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठविला आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक सांडपाणी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात चौदा वर्षापुर्वी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशन यांच्या वतीने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) सुरू करण्यात आले. क्षेत्रातील कारखान्यांतील सांडपाण्यावर सीईटीपी केंद्रात तसेच क्षेत्रा बाहेरील कारखान्यांत कंपनीतच ईटीपी केंद्रात प्रक्रिया केली जात आहे. मात्र त्यानंतर पाताळगंगा नदी प्रदूषणचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ तिव्र नाराजी व्यक्त करत आहे. अधुन मधुन चोरून प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याने जलचर प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. आशी ग्रामस्थांची तक्रार आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त आसतो. त्यामुळे प्रदूषित सांडपाणी सोडण्याचे जास्त प्रकार घडतात असे सांगण्यात आले. तर पाताळगंगा नदीच्या प्रदूषण बाबत संबंधीताकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप धर्मराज जाधव यांनी केला आहे. 

आर्थिकमंदीत पंधरा विस वर्षात गरूडीया केमिक्ल, जयशिंथ डायकेम, टाटा फार्मा, जर्मन रेमिडाईज, सिध्देश्वरी सल्फर प्राँडक्ट, टिम टिम, इपीक केमिक्ल, मेटासल्फ, इंनसिल्को आदि रसायन हातळणारी कारखाने बंद पडले आहे. तसेच सुरू असलेल्या रसायन निर्मीती कारखान्यांत आधुनिक संयंत्र बसविले गेले असल्याने प्रदूषण कमी झाले आहे. असे कारखानदांराचे म्हणणे आहे. 

"सीईटीपी केंद्रात प्रदूषित सांडपाण्यावर चांगली उपाय योजना करण्यासाठी संयंत्रात आद्युनिक यंत्र बसवावी. केंद्रातील प्रक्रिया केलेले सांडपाणी खारपाडा जवळ समुद्रात सोडावे. सांडपाणी वाहुन नेणारी जुनी आणि जीर्ण वाहीनी बदली करावी. क्षेत्रा बाहेरील खालापुर तालुक्यातील कारखान्यांतील सांडपाण्यावर सीईटीपी केंद्रात प्रक्रिया करावी. नैसर्गिक नाल्यांत चोरून प्रदूषित सांडपाणी सोडले जाणार नाही. त्यासाठी उपाय योजना करावी आणि नागरी वसाहतीतील सांडपाण्यावर ग्रामपंचायतीने केंद्र उभारून नदीत सांडपाणी प्रक्रिया करून सोडावे 
"धर्मराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: Patalganga river pollution question is serious