शिक्षणाच्या जिद्दीने केली गरिबीवर मात ; पवन पोवारचे शिष्यवृत्तीत नेत्रदीपक यश

गोठणे पुनर्वसनचा पवन पोवार; शिष्यवृत्तीत नेत्रदीपक यश, शिक्षकांचे योगदान
PAWAN POWAR
PAWAN POWARSAKAL

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील(sangmeshwar taluka) दुर्गम भागातील गोठणे पुनर्वसन जि. प. प्राथमिक शाळेतील मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत (scolorship exam)नेत्रदीपक यश मिळवले आहे. झोपडीत राहणाऱ्या पवन धोंडीबा पोवार(pawan pawar) याने कोणतीही कुरकूर न करता झोपडीतच अभ्यास करत पूर्व माध्यमिक यादीत स्थान पटकावले आहे. या शाळेचा निकालही १०० टक्के असा सर्वोत्तम लागला आहे.जिल्ह्याचे अगदी शेवटचे टोक व दुर्गम भागात वसलेल्या गोठणे या गावात चांदोली अभयारण्य येत असल्यामुळे या गावाचे पुनर्वसन हातिव या गावात करण्यात आले. विशेष म्हणजे या दुर्गम भागातील मुलांना शाळेची गोडी लावण्यात आली तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना यश मिळाले आहे.

PAWAN POWAR
Ind vs SA ODI | भारतासाठी आजचा सामना 'करो या मरो'

या पुनर्वसन भागात अजूनही पक्की घरे बांधण्यात आलेली नाहीत. झोपडीतच हे ग्रामस्थ राहतात. तसे अभ्यासाला सुखसोयी नसताना या झोपडीतच बसून मुले अभ्यास करत असून, त्यांना यशही चांगले मिळाले आहे. विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांचाही यात सिंहाचा वाटा आहे. या मुलांना वर्गशिक्षक रमेश शिवगण तसेच मुख्याध्यापक रेश्मा जाधव, केंद्रप्रमुख अशोक भालेकर, युगंधरा सुर्वे, प्रकाश जाधव, शिवाजी काळे, विलास मांडवकर यांचे मार्गदर्शन लाभले. या मुलांनी झोपडीत अभ्यास करून मिळवलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

PAWAN POWAR
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची केंद्राला चिंता

नंदिनी पोवारचेही यश

नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा (scolorship exam)निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. पवन धोंडीबा पोवार याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर नंदिनी पोवार हिनेसुद्धा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत यश मिळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com