esakal | रत्नागिरीत होणार आता PCV चे लसीकरण; महिन्याला मिळणार लस
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत होणार आता PCV चे लसीकरण; महिन्याला मिळणार लस

रत्नागिरीत होणार आता PCV चे लसीकरण; महिन्याला मिळणार लस

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (PCV) ही नविन लस समाविष्ट करण्यात आली आहे. रत्नागिरीतही लसीकरण सुरु करण्यात येणार असून त्यासाठी 1100 मात्रा प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक महिन्याला ही लस मिळणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले. या संदर्भात रत्नागिरीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सुकाणू समितीची सभा संपन्न झाली. या लसी संदर्भात संपूर्ण आढावा घेण्यात आला.

निमोकोकस आजार स्ट्रेप्टोकोकस निमोनी या जिवाणूमुळे होतो. पुढील स्वरुपात निदर्शनास येतात. निमोनिया, मेनिनजायटिस, बॅक्टेरीमिया, सेप्सीस, ओटायटीस, सायनोसायटीस इ. न्युमोकोकल निमोनिया हा श्वसन मार्गाला होणार संसर्गजन्य आजार असून यामध्ये फुप्प्फुसांवर सुज येते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. खोकला, धाप लागणे, ताप येणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे आहेत.

हेही वाचा: 'कर्तृत्व’ कुठे कमी पडले ? ऐतिहासिक निकालात 20 जणांच्या दांड्या

पाच वर्षाच्या आतील मुले विशेषत: 2 वर्षाच्या आतील मुलांना हा आजार होण्याचा आणि मृत्यूचा धोका सर्वात जास्त असतो. कुपोषण व रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या बालकांमध्येही संसर्गाचा धोका अधिक असतो. गंभीर स्वरुपाच्या निमोनियामध्ये साधारणत: 16 टक्के प्रमाण हे न्युमोकोकल निमोनियाचे असते. तसेच एकूण निमोनियामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये 30 टक्के मृत्यु हे न्युमोकोकल निमोनियामुळे होतात. अशा प्रकारे न्युमोकोकल निमोनिया ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. त्यावर प्रतिबंधांत्मक उपाययोजना म्हणून न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (PCV) लसीचा समावेश नियमित लसीकरणामध्ये करण्यात आला आहे.

साधारणत: 146 देशांमध्ये या लसीचा वापर नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत आधीच करण्यात आलेला आहे. त्यामुळे न्युमोकोकल निमोनियामुळे होणाऱ्या आजारामध्ये व मृत्युमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसुन येते. तसेच खाजगी वैदयकिय क्षेत्रामध्ये PCV लस यापुर्वीच वापरण्यात येत आहे. परंतु यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येक डोसमागे साधारणत: 2500/- ते 3000/- रुपये खर्च येतो. सर्व शासकीय रुग्णालय, प्रा. आ. केंद्र, ग्रामीण रुगालय, उपजिल्हा रुग्णाय व नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी PCV लस मोफत देण्यात येणार आहे. लस तीन डोसमध्ये दिली जाते. दोन प्राथमिक डोस वयाच्या सहाव्या व चौदाव्या आठवड्यात आणि एक बुस्टर डोस वयाच्या 9 व्या महिन्यात देण्यात येणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे. न्युमोकोकस आजारापासुन प्रभावी संरक्षण मिळण्यासाठी सर्व पात्र बालकांना PCV चे तीनही डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा: थ्री टी प्लस व्हॅक्सिन धोरण राज्यभर राबवणार; राजेश टोपेंची माहिती

या सभेला डॉ. अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. रत्नागिरी, योगेश जवादे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. दिलिप माने ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी फॉर कोविड 19, डॉ. गोविंद पं. चौधरी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी फॉर कोविड 19, डॉ. संगिता चं. देशमुख सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. चंद्रकांत शेरखाने निवासी वैद्यकीय अधिकारी बाहय रुग्ण, डॉ. श्री. दिनेश सुतार माता व बाल संगोपन अधिकारी, जि. प. रत्नागिरी, डॉ. सतिश गुजलवार जिल्हा सर्वेक्षण अधिकारी जि.प.रत्नागिरी हे अधिकारी उपस्थित होते.

loading image