पेन्शन धारकांची जीवन प्रमाणपत्र फसवणूकीच्या विरोधात नाराजी

पेन्शन धारकांची जीवन प्रमाणपत्र फसवणूकीच्या विरोधात नाराजी

रसायनी (रायगड) - रसायनी परीसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे व परीसरात पेन्शन धारकांचे आँनलाईन जीवन प्रमाणपत्र भरताना फसवणूक केली जात आहे. पेन्शन धारकांची नुकतीच एचओसी काँलनीतील श्री साईबाबा मंदिरात बैठक झाली आहे. या बैठकीत अनेक खातेदारांनी फसवणूकीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. 

दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक तारखेपासून पेन्शन खातेदारांचे जीवन प्रमाणपत्र आँनलाईन भरून घेतले जातात. मोहोपाडा परीसरात चार पाच ठिकाणी प्रमाणपत्र भरून घेतले जात आहे. हे प्रमाणपत्र भरून घेताना काही बँक व खाजगी बुथवाले मनमानी पणाने पैसे घेतात आशी खातेदारांची तक्रार आहे. 

ज्या बँकामध्ये पेन्शन धारकाचे खाते आहे. त्या बँकेची खातेदरांचे जीवन प्रमाणपत्र भरून घेणे ही जबाबदारी आहे. बँकांना या कामाचे कमिशन मिळत आहे. मात्र बँका टाळाटाळ करतात. या बाबत भविष्य निर्वाह आयुक्त यांच्या कडे तक्रार करण्यात आली आहे. असे रायगड औद्योगिक पेन्शनर व वेलफेअर आसोशिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव बामणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com