शेतकरीदादा आंबा विकायचा आहे मग करा येथे अर्ज....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आंबा वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडून पास १ आठवड्याकरता दिला जाणार आहे.

रत्नागिरी : तयार होऊ घातलेला आंबा न्यायचा कुठे हा प्रश्न सुटला  आहे. पण आंबा वाशीत पाठवला तरी मार्केट मध्ये विक्री कशी करायची यावर मार्ग काढण्याचे आव्हान आहे.

हेही वाचा- कोल्हापूर जिल्हा बाजार समितीत काय आहे भाजी पाल्याची स्थिती...? जाणून घ्या... -

 आंबा वाहतुकीला परवानगी पण..

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आंबा वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडून पास १ आठवड्याकरता दिला जाणार आहे.

व्हॉट्सऍपवर अर्ज केल्यावर आंबा वाहतुकीसाठी डिजिटल परवानगी मिळेल. त्यासाठी आंबा  बागायतदार यांनी आपला गाडी नंबर,  कोठून कोठे जाणार, ड्रायव्हरचे नाव, लायसेन्स आदी माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक्य आहे. अडचण आल्यास संबंधित जिल्हा अधीक्षक रत्नागिरी अधीकारी  जगताप (9420008001), तालुका अधिकारी रत्नागिरी विनोद हेगडे (9405837380), के व्ही बापट तालुका रत्नागिरी (9422465828) यांच्याशी संपर्क करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या परीक्षांचे काय ? वाचा

आंबा वाहतुकीची समस्या सुटली पण
कोंकणातील आंबा विक्रीसाठी मुंबईत पाठवला जातो. पण मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी रत्नागिरीतील बागायतदारांना विक्री कशी करायची असा प्रश्न केला. आंबा पाठवला तरीही मार्केट बंद असल्यामुळे आंबा वाशीत व्यापाऱ्याकडे पडून राहणार आहे. आंबा वाहतुकीची समस्या सुटली तरीही आंबा विकायचा कुठे हा प्रश्नच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission to transport mangoes in Ratnagiri koakan marathi news