esakal | एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या परीक्षांचे काय ? वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

What about university exams? kolahapur marathi news

शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या असल्या तरी एकवीस दिवस देशभरात संचारबंदी लागू केल्याने विद्यापीठाच्या परीक्षांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या परीक्षांचे काय ? वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या असल्या तरी एकवीस दिवस देशभरात संचारबंदी लागू केल्याने विद्यापीठाच्या परीक्षांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक एप्रिलनंतर परीक्षा सुरू होतील, असे गृहीत बांधले गेले होते. मात्र, आता या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे की त्यात बदल होणार, अशी विचारणा विद्यार्थ्यांतून होत आहे.

हेही वाचा-रस्ता अडवला, खडा पहारा ; पाचल गाव झाले स्वतःहून क्वारंटाईन..

विद्यापीठाच्या परीक्षांचे काय ?

राज्य शासन व उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत विद्यापीठाला सुट्टी जाहीर केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा २७ मार्चपासून नियोजित होत्या. शासनाच्या आदेशामुळे परीक्षा १ एप्रिलपासून परीक्षा व प्रात्यक्षिके पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील, अशी माहिती
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली होती. बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, बी.सी.ए, बी. व्होक, एम. ए,  एमस्सी, डिप्लोमा अशा एकूण ६८० परीक्षा होणार आहेत.

हेही वाचा- Corona Impact : आगीतून फोफाट्यात मच्छीमारांची झालीय अवस्था...

सूचनेनुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरवले जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या परीक्षांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आह. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासन स्तरावर त्या संदर्भात हालचाली सुरू असल्याचे कळते. त्यांच्या सूचनेनुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरवले जाईल, असे सांगितले.