पेट्रोल-डिझेल दरवाढीबद्दल सोशल मिडीयावर सामान्यांची खदखद

अमित गवळे
बुधवार, 23 मे 2018

पाली - महागाई व पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीच्या विरोधामुळे चार वर्षापुर्वी मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या अवाजवी वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य जनतेमध्ये सरकार विरोधात प्रंचड असंतोष पसरला आहे. परिणामी हा असंतोष व राग सोशलमिडीयाच्या माध्यमातून मार्मिकपणे व्यक्त होत आहे.

पाली - महागाई व पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीच्या विरोधामुळे चार वर्षापुर्वी मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या अवाजवी वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य जनतेमध्ये सरकार विरोधात प्रंचड असंतोष पसरला आहे. परिणामी हा असंतोष व राग सोशलमिडीयाच्या माध्यमातून मार्मिकपणे व्यक्त होत आहे.

मागील दोन दिवसांपासून फेसबूक, व्हॉट्सअॅप व ट्विटर पेट्रोल डिझेलच्या दरवाढी बद्दल अनेक जोक्स, संदेश, व्यंगचित्र, व्हिडीओ व अॅनिमेशन फिरत आहेत. ज्या आश्वासनांच्या जोरावर मोदी सरकार सत्तेवर आले त्या आश्वासनांची आठवण देखिल या विवीध संदेशांच्या माध्यमातून करुन दिली जात आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी व इतर भाजप नेत्यांनी चार वर्षांपुर्वी महागाई व पेट्रोल आणि डिझेल दरवाढीसंदर्भात केलेल्या भाषणांचे व आंदोलनांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतांना दिसत आहेत. 

या बरोबर मोदी समर्थक देखिल बाह्या सरसावून या सगळ्याचे लंगडं समर्थन करतांना दिसत आहेत. तसेच अनेकजण नरेंद्र मोदी व मनमोहन सिंग सरकारची तुलना देखिल करत आहेत. अनेक पोस्टवर अशा प्रकारे जुगलबंदी पहायला मिळत आहे. या सर्व उहापोहात आगामी निवडणूकांत जनतेचा कौल मात्र सुज्ञांना समजत आहे.

मागील सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठ्या अपेक्षा ठेवून मोदी सरकारला जनतेने निवडून दिले. महागाई व पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमुळेच मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र या सरकारने सामान्य जनतेचा मोठा हिरमोड केला आहे. या भाववाढीमुळे सामान्य व गरिब माणूस भरडला जात आहे. या भाव वाढिच्या समर्थनार्थ केलेले दावे अतिशय अतार्किक व गैरलागू आहेत. हे सरकार जनतेला मुर्ख समजते का?
- सचिन कारखानीस, सुज्ञ नागरीक, पाली

सोशल मिडीयावरील खदखद
१) बहुत हुई जनता पर पेट्रोल-डिजल की मार....अबकी बार लांबूनच नमस्कार 
२) वो दिन दूर नही जब लोग गाडी कैश से खरीदेंगे और पेट्रोल लोन लेकर भरेंग –
३) मोदींना पाठिंबा म्हणून … मी १०० रुपये लिटरचे सुद्धा पेट्रोल भरु शकतो - अंध भक्त.
४) या वेळी प्रचारासाठीचा खर्च कमी होईल बहुतेक.. दिड दिड कोटींच्या सभा नको फक्त २०१४ ची भाषणे प्रोजेक्टरवर लावा.
५) ८४ रुपये लिटरचं पेट्रोल बाइक मध्ये टाकल्यावर सायलेन्सर मधून एक आवाज आला - "मालक.… बघा नायतर पायंडल बसवून घ्या…"
६) अब पेट्रोल के जो दाम दिन बदिन बड रहे वो किसके नाकामयाबी के नतीजे है?७) अच्छे दिन – करुन दाखवलं....! आतापर्यंत सर्वात महाग पेट्रोल विकून दाखवलं.…८) नरेंद्र मोदी व मनमोहनसिंग याच्या फोटो समोर… भ्रष्टाचारी कौन ? १०० डॉलर प्रति बैरल खरीदकर ७१ रुपए प्रति लीटर पेट्रोल देने वाला । ६८ डॉलर प्रति बैरल खरीदकर ८४ रुपए प्रति लीटर पेट्रोल देने वाल ।

Web Title: petrol and diesel price hike mimic on social media