ओरोस: नियोजन समितीत 2022-23 च्या आराखड्याला मंजुरी; उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant
ओरोस: नियोजन समितीत 2022-23 च्या आराखड्याला मंजुरी; उदय सामंत

ओरोस: नियोजन समितीत 2022-23 च्या आराखड्याला मंजुरी; उदय सामंत

ओरोस: जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या सभेत २०२२-२३ च्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन (Online)आणि ऑफलाईन (Offline)पद्धतीने झालेल्या या सभेत २६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य नियोजन मंडळाकडे (State Planning Board)हा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा: ST STRIKE : शरद पवार, अनिल परब आणि कृती समितीची पत्रकार परिषद

जिल्हा नियोजन समितीच्या(District Planning Committee) नवीन सभागृहात पालकमंत्री उदय सामंत,(Uday Samant)जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, आ दीपक केसरकर, आ वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार तर ऑनलाईन पद्धतीने खा विनायक राऊत, आ बाळा पाटील, आ अनिकेत तटकरे, आ निरंजन डावखरे, गटनेते रणजित देसाई, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विष्णुदास कुबल, अंकुश जाधव, रोहिणी गावडे, विकास सावंत, बाळ कनयाळकर यांच्यासह अन्य सदस्य व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: कोरोनाचा वाढता धोका! महाराष्ट्रासह पाच राज्यांची मांडवियांसोबत बैठक

जिल्हा नियोजन मंडळाकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांकडून ५०५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यातील २६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये १७० कोटींचा मूळ आराखडा आहे. ५० कोटी रुपये आम्हाला जादा हवे आहेत. तर अखर्चित ४५ कोटी रुपये शासनाला गेले आहेत. त्याचीही मागणी या आराखड्यातून करण्यात आली आहे. असा एकूण २६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top