रत्नागिरी, खेड, दापोली मार्गावर धावली लालपरी ....असे आहे नियोजन..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

मंडणगड आगारातून दिवसभरात नऊ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे..

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड आगारातून दिवसभरात नऊ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून तालुक्यातून रत्नागिरी, खेड व दापोली मार्गावर प्रथमच लालपरी धावली. त्यामुळे नागरिकांना एसटीची सोय करण्यात आली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून एसटीची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागाची खरी ओळख असणारी आणि जीवनदानी ठरणारी एसटी आगारातच उभी राहिली होती. त्यामुळे आगाराचे लाखोंचे नुकसान झाले आहे.  जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील काही सेवा पूर्ववत करताना सोशल डिस्टन्स पाळून परवानगी दिली आहे. त्यामुळे मंडणगड आगराच्या वतीने दिवसभरात नऊ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा- त्या आदेशाला एक वर्षाची मुदतवाढ ; प्रकाश जावडेकर

मंडणगड आगारातून नऊ फेऱ्यांचे नियोजन

यात मंडणगड-रत्नागिरी सकाळी ७ वाजता, मंडणगड- खेड सकाळी ७:४५, मंडणगड-दापोली सकाळी ८:१५ वाजता, मंडणगड-दापोली सकाळी ९:१५ वाजता, मंडणगड-खेड सकाळी ९:४५ वाजता, मंडणगड-दापोली दुपारी १ वाजता, मंडणगड-खेड दुपारी १:३०, मंडणगड-खेड दुपारी ३:३०, मंडणगड-दापोली संध्याकाळी ४ वाजता या फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आज ता.२३ मे रोजी रत्नागिरी, खेड व दापोली मार्गावर तीन गाड्या रवाना झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांनी दिली. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील लाल परीचे दळणवळण अजूनही सुरू झाले नसल्याने तालुक्यात शांतता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: planning nine rounds a day from mandangad division