esakal | चिपळुणात तोतया पत्रकाराविरुद्ध पोलिसांत तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात तोतया पत्रकाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

चिपळूण - येथे तोतया पत्रकारांचे पेव फुटले आहे. हे तोतया पत्रकार चॅनलच्या नावे लोकांना ब्लॅकमेलिंग करून धमकावत आहेत. पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीला अशाच एका तोतया प्रकाराचा अनुभव आल्यामुळे संस्थेकडून अलोरे- शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

चिपळुणात तोतया पत्रकाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - येथे तोतया पत्रकारांचे पेव फुटले आहे. हे तोतया पत्रकार चॅनलच्या नावे लोकांना ब्लॅकमेलिंग करून धमकावत आहेत. पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीला अशाच एका तोतया प्रकाराचा अनुभव आल्यामुळे संस्थेकडून अलोरे- शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या जमान्यात मोबाईलवर शुटिंग करून अनेकजण चॅनेलचे पत्रकार असल्याचा आव आणत आहेत. यातील काहीजणांनी ब्लेकमेलिंग आणि लुटमारीचा धंदा सुरू केला आहे. एका मोठ्या चॅनेलचा टीम लिडर असल्याचे सांगून एक तोतया पत्रकाराने 26 जून 2019 ला मंदार संस्थेला पत्र पाठवून व संस्थेच्या दुरध्वनीवर सतत फोन करून धमकाविण्याचा प्रयत्न केला. 26 जूनला हा तोतया पत्रकार संस्थेच्या मेनगेटवर आला. त्याने एक गेटवर एक पाकिट ठेवले. त्यामध्ये टीम लिडर या नावाने सही असलेले एका चॅनेलचे पत्र व आणि एक व्हिडीओ होते. त्याच दिवशी दुपारी एक ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या तोतया व्यक्तीने संस्थेच्या दुरध्वनीवर सतत फोन करून त्याने पाठविलेल्या पत्राच्या व सिडीच्या आधारे संस्थेला धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्याने दिलेल्या मोबाईलवर संस्थेचे सीईओ यांनी प्रत्यक्ष बोलावे, अशी सतत मागणी करत होता. संस्थेच्या त्याच्या विरोधात अलोरे - शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे तोतया पत्रकार तुर्तास शांत झाला आहे.

loading image