esakal | महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ; पोलिसांनीच तयार केले पोलिसांसाठी कोविड सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

police covid center Construction ready First venture in Maharashtra Concept of Superintendent of Police Mundhe

पोलिस अधीक्षक मुंढे यांची संकल्पना

महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ; पोलिसांनीच तयार केले पोलिसांसाठी कोविड सेंटर

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  कोरोना योद्धा म्हणून रस्त्यावर लढणारे पोलिस कर्मचारी आता मोठ्या संख्येने बाधित होताना दिसत आहेत. त्यात सणासुदीचे दिवस असल्याने पोलिस दलाला मनुष्यबाची गरज आहे. बाधित पोलिस कर्मचार्‍यावर तत्काळ आणि चांगले उपचार होऊन पुन्हा या कोरोना युद्धामध्ये ते सामिल व्हावेत या उद्देशाने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नवी संकल्पना पुढे आणली. पोलिस मुख्यालयाजवळच त्यांनी पोलिसांसाठी 50 खाटांचे कोविड सेंटर तयार केले असून आज ते सुरू करण्यात आले.


कोरोनाशी युद्ध लढताना त्यांचा संसर्ग थांबविण्यासाठी पोलिस रस्त्यावर राबत आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 54 पोलिस कर्मचारी आणि काही अधिकारी, कुंटुबिय कोविड  बाधित झाले आहेत.  एकट्या  शहर  पोलिस ठाण्यातील 11 कर्मचारी बाधित झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखताना हे पोलिस कर्मचारी नागरिकांच्या संपर्कात येत आहेत.  त्यामुळे पोलिस कर्मचारी ही बाधित होत असून यंत्रणेवर ताण पडत आहे.  मात्र आपले कर्मचारी,  त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे पुढे सरसावले.


हेही वाचा- खवय्ये काढणार कोरोनाचा काटा -


त्यांनी पोलिस मुख्यालयातील इमारतीमध्ये पोलिस व त्यांच्या कुटुंबासाठी 50 खाटांचे कोविड सेंटर उभे केल आहे. मुढे स्वतः डॉक्टर असून त्यांना कोविडचा  अनुभव स्वतः घेतला आहे. अशा वेळी काय करावं व काय करू नये, यांची पूर्ण कल्पना त्यांना आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा कर्मचार्‍यांना व्हावा, कोरोनाला हरवून कर्मचारी पुन्हा या युद्धात सामिल व्हावे, यासाठी हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

हेही वाचा-रत्नागिरीतील 330 शिक्षक जाणार आता परजिल्ह्यात -


शासकीय रुग्णालयाच्या मार्गदर्शन खाली इथे उपचार केले जाणार आहेत. दिवसातून दोन वेळा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर इथे भेट देऊन येथील रुग्णांना तपासणार आहेत. अगदीच गरज असेल तर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येईल  या कोविड सेंटर ची देखभाल एक पोलिस अधिकारी करणार आहे. इथे असलेल्या रुग्णांना कोणती अडचण वा काही समस्या असल्यास  त्यावर लक्ष ठेवून समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. महाराष्ट्रातील पहिलाच आगळावेगळा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात राबविला आहे त्यामुळे कर्मचार्‍यांनी मानसिकदृष्ट्या दिलासा मिळणार असून त्याचे मनोधैर्य नक्कीच वाढवून पुन्हा ते जोमाने कामाला लागणार आहेत.

संपादन - अर्चना बनगे

loading image