esakal | पोलिस दलातील 'या' 3 जागेसाठी होणार रस्सीखेच; 5 हजार अर्ज दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस दलातील 'या' 3 जागेसाठी होणार रस्सीखेच; 5 हजार अर्ज दाखल

पोलिस दलातील 'या' 3 जागेसाठी होणार रस्सीखेच; 5 हजार अर्ज दाखल

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील ६६ रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात बॅन्ड्समनच्या अवघ्या तीन जागांसाठी तब्बल ५ हजार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी ३ सप्टेंबरला लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी १७ केंद्रामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे एका जागेसाठी पावणेदोन हजार उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे तर अन्य शिपाई, चालक पदांसाठी अशीच स्पर्धा होणार आहे.

जिल्हा पोलिस दलामध्ये २०१९ मधील भरती आता घेण्यात येणार आहे. एकूण ६६ पोलिस शिपाई आणि ४४ चालक पदांसाठी ही प्रक्रिया हेणार आहे. यामध्ये शिपाई, चालक आणि बॅन्ड्समन या पदांचा समावेश आहे. जिल्हा पोलिसदलात बॅन्ड्समन हे पद देखील कार्यरत आहे. शासकीय कार्यक्रमा मध्ये प्रामुख्याने प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्र दिन या वेळी या बॅन्ड्समनकडे मोठ्या आदराने पाहिले जाते. या शासकीय कार्यक्रमात बॅन्ड्समननी वाजवलेली धून कानी पडताच अनेकांची छाती गर्वाने फुलते. जिल्हा पोलिस दलात सध्या शिपाई पदासाठी पदभरती सुरू आहे. यात बॅण्ड पथकातील केवळ तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या ३ जागांसाठी तब्बल ५ हजार अर्ज आले आहेत. बेरोजगारी आणि कोरोनाने वाढलेल्या बेकारीमुळे या जागांसाठी सर्वांधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे तीन जागांसाठी उमेदवारांचे कौशल्य पणाला लागणार आहे. यात तज्ञ व्यक्तींसमोर परीक्षा द्यावी लागणार असल्याने सर्वोत्तम उमेदवाराचीच निवड होणार आहे.

हेही वाचा: ‘बल्क ड्रग्ज पार्क’ आता रायगड जिल्ह्यातील रोहा, मुरुडात

पोलिस दलाकडे शिपाई पदासाठी १२ हजार ७६९ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी ५ हजार ५०६ उमेदवारांनी पासवर्ड व प्रवर्ग बदलण्यासाठी कार्यवाही केली आहे तर ४४ चालक पदासाठी ३ हजार ६४० उमेदवारांचे अर्ज आले असून १ हजार ९०२ उमेदवारांनी पासवर्ड व प्रवर्ग बदलाबाबतची कार्यवाही केली आहे. त्यांना बल्क एसएमएसद्वारे कळविण्यात आल्याचे पोलिस दलाने सांगितले. त्यांच्या भरतीसाठीच्या पुढील प्रक्रियेमध्ये सामिल होता येणार आहे; मात्र ज्यांनी पासवर्ड आणि प्रवर्ग बदलाबाबतची कार्यवाही केलेली नाही त्या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सामिल होता येणार नाही.

loading image
go to top