पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात

सुनील पाटकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

महाड : पोलिस ठाण्यात दहा हजार रुपयांची लाच घेतांना महाड तालुका पोलिस ठाण्याचा उफनिरिक्षक रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. आज सकाळी साडे अकारा वाजता ही घटना घ़डली. शंकर रमेश जासक असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असुन ते महाड तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
 
महाड तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदाराचा मुलगा न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याला सुविधा पुरवण्यासाठी जासक यांनी त्यांच्याकडे 26 डिसेंबरला पैशाची मागणी केली होती. या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक विवेक जोशी, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने सापळा रचला आज 27 डिसेंबरला सकाळी सोडे अकरा वाजता पोलिस ठाण्यात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपनिरीक्षक शंकर जासक यांना रंगेहाथ पकडण्यात आले. 

Web Title: Police sub-inspector trap in bribe case