आदिवासी, वंचित व गरजू विद्यार्थ्यांना खाकी वर्दीचा आधार

अमित गवळे
सोमवार, 16 जुलै 2018

पाली - पोलीसांच्या काळजातही सहानूभुती, वात्स्यल्य आणि प्रेमाचा अविरत झरा असतो. याचे जिंवंत उदाहरण म्हणजे पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे. सामाजातील वंचित तसेच दुर्गम व तळागाळात राहणारी भावी पिढी शिकुन स्वतःच्या पायावर उभी रहावी यासाठी मागील चार वर्षापासून ते सर्व स्तरातील गरिब तसेच आदिवासी मुलांना शिक्षणासाठी मदतीचा हात देत आहेत.

पाली - पोलीसांच्या काळजातही सहानूभुती, वात्स्यल्य आणि प्रेमाचा अविरत झरा असतो. याचे जिंवंत उदाहरण म्हणजे पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे. सामाजातील वंचित तसेच दुर्गम व तळागाळात राहणारी भावी पिढी शिकुन स्वतःच्या पायावर उभी रहावी यासाठी मागील चार वर्षापासून ते सर्व स्तरातील गरिब तसेच आदिवासी मुलांना शिक्षणासाठी मदतीचा हात देत आहेत.

सुधागड तालुक्यातील हातोंड येथील मुळ निवासी आहेत. सध्या खोपली येथे वास्तव्यास असलेले राजेंद्र वाघमारे हे बीनतारी संदेश विभाग, मुंबई येथे पोलीस हवालदार आहेत. आदिवासी व गरजु विदयार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची धडपड व प्रयत्न सुरु आहे. नुकतेच त्यांनी सुधागड तालुक्यातील राजिप शाळा, हातोंड येथील विदयार्थ्यांना छत्र्या, रेनकोट, कपडे आणि खाऊचे वाटप केले.

राजेंद्र वाघमारे मागील चार वर्षांपासून नियमित स्वतःसह दानशूर व्यक्ती व सहकारी मित्र यांच्याकडून कपडे तसेच नवे व जुने असे वापरण्यायोग्य सर्व प्रकारचे शैक्षणिक व इतर साहित्य गोळा करतात. आणि या सर्व वस्तु पदरमोड करुन अगदी डोक्यावर उचलुन शाळेपर्यंत पोहचावीत असतात . या कार्याबरोबरच पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षा मार्गदशन मेळावे देखील राजेंद्र वाघामारे घेत असतात. त्यांच्या या कार्यास मित्र व सहाकार्यांबरोबरच त्यांचे आई-वडिल, पत्नी आणि दोन कन्यांची देखील महत्वपूर्ण साथ मिळते .

यावेळी त्यांचे सहकारी मित्र के. एस. कुबल (एएसआय) सुभाष दूधभाते  (पो. हवालदार) वैशाली ब्राम्हणे (प्रा. शिक्षिका - नेरळ) यांनी आर्थिक द्रुष्टया मदत केली. तसेच या शाळेतील शिक्षक रासकर सर, पाटील सर, भाड सर यांचे महत्वाचे सहकार्य लाभते.

आजु बाजूच्या शाळेतील शिक्षक देखिल ईथे येवून त्यांच्या शाळेतील मुलांना कपडे व तत्सम साहित्य घेऊन जातात.  त्यामुळे राजेंद्र वाघमारे अतिशय कष्टाने घेत असलेली मेहनत ही खऱ्या अर्थाने सार्थ होत आहे. अशा कर्तुत्ववान पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे पोलीस दलाची शान आणि सन्मान वाढत आहे. पोलीस दलाकडे आदराने पाहण्याचा समाजाचा द्रुष्टीकोण निर्माण होत आहे. असे राजिप हातोंड शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सकाळला सांगितले.

मी माझ्या मोठेपणासाठी हे कार्य करीत नसून, माणसातील माणूसपणा जपण्यासाठी आणि अंधकाराच्या चिखलात रुतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी माझी व मला सहकार्य करणाऱ्या मित्र परिवाराची नैतिक जबाबदारी म्हणून करीत आहे. "अज्ञाना सारखा दुसरा कोणताही मोठा आजार नाही ".अशा या समाजाला ज्ञानाच्या कक्षेत आणण्यासाठी समाजातील सबळ घटकांनी अशा दुर्बल घटकांना मदतीचा हात देवून साथ द्यावी.
 राजेंद्र वाघमारे, पोलिस हवालदार – ८०९७००४८०२ /९५११८५०८३९

Web Title: police support for tribals, deprived and needy students