गुहागरातील चार तरुणांनी धरली सायकलिंगची कास...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

सुदृढ आरोग्यासह प्रदूषणमुक्तीचा संदेश - फिटनेसचे महत्त्व पटले; गुहागर-चिपळूण २.५६ तासांत 

गुहागर - गुहागरातील तरुणांनी पुन्हा एकदा सायकल चालविण्यासाठी उद्युक्त व्हावे यासाठी काही तरुणांनी सायकलिंग सुरू केले आहे. रोज सकाळी मॉर्निंग वॉकऐवजी हे तरुण सायकल चालवतात. गेले दोन महिने सराव केल्यानंतर गुरुवारी (ता. ६) त्यांनी गुहागर-चिपळूण प्रवास २ तास ५६ मिनिटांत सायकलने पूर्ण केला.  

सुदृढ आरोग्यासह प्रदूषणमुक्तीचा संदेश - फिटनेसचे महत्त्व पटले; गुहागर-चिपळूण २.५६ तासांत 

गुहागर - गुहागरातील तरुणांनी पुन्हा एकदा सायकल चालविण्यासाठी उद्युक्त व्हावे यासाठी काही तरुणांनी सायकलिंग सुरू केले आहे. रोज सकाळी मॉर्निंग वॉकऐवजी हे तरुण सायकल चालवतात. गेले दोन महिने सराव केल्यानंतर गुरुवारी (ता. ६) त्यांनी गुहागर-चिपळूण प्रवास २ तास ५६ मिनिटांत सायकलने पूर्ण केला.  

आज सर्वत्र पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल चर्चा होते. वृक्षसंवर्धनाबरोबर प्रदूषण कमी करा म्हणून सल्ला दिला जातो. आरोग्याच्या दृष्टीने चालणे, सायकलिंग आवश्‍यक आहे, असेही सांगितले जाते. मात्र हा संदेश प्रत्यक्षात उतरविणारे फार थोडे लोक भेटतात. लोकांना संदेश देण्याऐवजी आपल्या कृतीतून दर्शन घडविले पाहिजे या हेतूने गुहागरातील अद्वैत जोशी, प्रथमेश दामले, शार्दूल भावे, डॉ. अनिकेत गोळे, केदार खरे, हेमंत बारटक्के या तरुणांनी सायकलिंगला प्राधान्य दिले. कोणताही ग्रुप तयार न करता प्रत्येकाने शहरातील कामे सायकलच्या माध्यमातून करावीत असा अलिखित नियम तरुणांनी केला. रोज सकाळी ज्याला वेळ असेल तो सायकल घेऊन फिरायला बाहेर पडतो. सुरवातीला केवळ शहराचा फेरफटका मारणाऱ्या या चौकडीने हळूहळू अंतर वाढवायला सुरवात केली. शहराबाहेर असगोली, पालशेत, शृंगारतळी, आरे, आरजीपीपीएल- रानवी अशा गावापर्यंत सायकलिंग सुरू झाले. यामधूनच चिपळूणपर्यंत जाण्याची कल्पना समोर आली. गुरुवारी या सर्व मंडळींनी सायकलने चिपळूणला जाण्याचे निश्‍चित केले. खबरदारी म्हणून सोबत एक चारचाकी घेतली.

गुहागरातून अद्वैत जोशी, प्रथमेश दामले, शार्दूल भावे, डॉ. अनिकेत गोळे, केदार खरे, हेमंत बारटक्के ही मंडळी सकाळी साडेपाच वाजता बाहेर पडली. मार्गताम्हाने-रामपूर दरम्यान धुक्‍यात हरविलेल्या रस्त्यावरून सायकलिंग करतानाचा अनुभव आनंददायी असल्याचे प्रथमेश दामले यांनी सांगितले. आपल्याकडील काही तरुण सायकलिंग करताना पाहून रस्त्यावरील काही ग्रामस्थांनी शुभेच्छाही दिल्या, असे शार्दूल भावे यांनी सांगितले. 

गुहागरातील (कै.) गोविंदराव दीक्षित, ना. ह. खरे, वसंत जोशी अशी सत्तरीतील अनेक ज्येष्ठ मंडळी सायकल चालवायची. त्यावेळी आम्ही मोटारसायकल फिरवित होतो; मात्र आज सायकलिंग सुरू केल्यावर त्याच्या फिटनेसचे कोडे उलगडू लागले आहे, अशी प्रतिक्रिया अद्वैत जोशी यांनी व्यक्त केली.

Web Title: polution free message on cycle