पाण्याअभावी भाताची रोपे करपण्याची शक्यता

अमित गवळे
शनिवार, 16 जून 2018

पाली - जुनच्या पहिल्या अाठवड्यात जिल्ह्यात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली होती. परिणामी भाताची रोपे चांगली तरारली. परंतू मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याअभावी भाताची रोपे करपुन शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळेबळिराजा चिंतातुर झाला आहे. जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सकाळच्या माध्यमातून शेतकर्यांना खबरदारी घेण्याचे अावाहन केले आहे

रायगड जिल्ह्यात 1 लाख १० हजार हेक्टरवर प्रत्यक्ष भाताची लागवड केली जाते. प्रती हेक्टरी सरासरी २६ ते २८ क्विंटल भाताचे उत्पादन घेतले जाते. यंदा जिल्ह्यात भाताची रोपे चांगली तरारली असतांनाच मागील चार-पाच दिवसांपासून वरुन राजाने मात्र दडि मारली आहे. सर्वत्र कडक ऊन पडले आहे. त्यामुळे भाताची पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावून त्याचा श्रम अाणि पैसा दोन्ही वाया जाणार आहे.हाती अालेली पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांची मात्र मोठी धडपड सुरु आहे.

अापत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिलेल्या पर्जन्यमानाच्या अाकडेवारी नुसार शुक्रवारी (ता.१५) जिल्ह्यात सरासरी अवघा २.२८ मिमी पाऊस झाला.  खालापुर, माणगावर,महाड, पोलादपुर व श्रीवर्धन या तालुक्यात १५ ताखेला शुन्य मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता.१४) सरासरी १.३३ मिमी,  बुधवारी (ता.१३) सरासरी ०.६० अाणि मंगळवारी (ता.१२) सरासरी २.६९ मिमी एवढेच पर्जन्य झाले.

खबरदारी घ्या
ऊन व वादळी वा-यामुळे भाताची रोपे सुकण्याची भिती अाहे. तसेच जमीन देखिल कोरडी होऊ शकते. दोन दिवस पाऊस आला नाही तर शेतकर्यांना पिकांना पाणी द्यावे लागेल. त्यासाठी हंडा, बादली किंवा झा-याने रोपांना पाणी द्यावे. तसेच शेतकर्यांनी रोपांना (पिकांना)युरिया किंवा इतर खते सध्या मारु नयेत. पाऊस अाल्यावर शेतात पाणी साठल्यावरच खत मारावे.

पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, अलिबाग
पाऊस झाला नाही तर हाताशी आलेली भाताची रोपे करपुन जाण्याची भिती आहे. भात रोपे टिकविण्यासाठी शेतकरी नदी, नाले,ओढ्यातील पाणी रोपांना घालत आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावल्यास पेरणीसाठी बियाने शिल्लक राहिलेले नाही. अशा परिस्थितीत शासनाने शेतकर्यांना बियाणे उपलब्ध करुन द्यावे.
- अरुण पाटील, शेतकरी, पेण

Web Title: The possibility of rice seedlings due to lack of water