पाताळगंगा नदीच्या पुलावर धोकादायक खड्डे

लक्ष्मण डूबे 
सोमवार, 2 जुलै 2018

रसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पराडे ते श्री सिध्देश्वरी या मुख्य रस्त्यावरील पाताळगंगा नदीवरील पुलावर खड्डे पडले आहे. त्यामुळे जाताना वाहन चालकांचे हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खड्डे चुकवताना अपघाताची भिती वाहन चालक व्यक्त करत आहे. दर वर्षी पावसाळा सुरू झाला की पुलावर लवकर खड्डे पडतात. मात्र एमआयडीसी कायम स्वरूपी उपाय योजना करण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याची कारखानदांर आणि वाहन चालकांची तक्रार आहे. 

एमआयडीसीच्या या पुलावरून पाताळगंगा, अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तसेच क्षेत्रा बाहेरील कारखान्यांत आणि वडगाव, इसांबे, माजगाव, जांभिवली, कराडे खुर्द आणि चावणे आदि ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांकडे वाहनांची भरपूर वर्दळ असते. पाऊस सुरू झाला की, पुलावर दर वर्षी लवकरच खड्डे पडतात. त्यामुळे जाताना वाहन चालकांचे हाल होत आहे. पाऊस सुरू असल्यास खड्डे पाण्यानी भरलेले असतात. हे खड्डे दिसत नाही त्यामुळे खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन एमआयडीसीने उपाय योजना करण्यासाठी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप कारखानदांर आणि वाहन चालकांनी केला.

पावसाळ्यात पुलावर पाणी साचते म्हणुन लवकर खड्डे पडतात. मे मध्ये पुलाच्या पृष्ठ भागाच्या सांध्यांचे मजबूतीकरण करण्यात आले. तेरा दिवस हे काम सुरू होते. हे काम सुरू  आसताना पुलावरील पाण्याचा निचरा सुरळीत होईल त्यासाठी उपाय योजना केली पाहिजे होती. 
- चंद्रशेखर शेंडे, बाँम्बे डाईन्ग, महाव्यवस्थापक

Web Title: potholes on patalganga river bridge