सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा शिवसेनेकडे असतील - प्रदीप बोरकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सावंतवाडी - जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याबाबत कुठेही दुमत नाही, त्यांनी पाठीवरून हात फिरवल्यानंतर आम्ही कोणतेही काम करू, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात असेल, असा दावा शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघाचे समन्वय प्रदीप बोरकर यांनी येथे केला.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. त्याची नांदी आजपासून सावंतवाडीतून सुरू करण्यात आली आहे. आम्ही कामाला लागलो आहे, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

येथील विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, नारायण ऊर्फ बबन राणे, सागर नाणोसकर आदी उपस्थित होते.

श्री. बोरकर म्हणाले, ""सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची काल (ता.16) बैठक घेण्यात आली. या शिवसेना सदस्य नोंदणी संदर्भात चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील शिवसेना बळकट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात याव्यात यावर्षी आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यादृष्टीने आम्ही कामाला लागलो आहे. त्याची सुरुवात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली आहे. आज ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सर्वजण येणाऱ्या निवडणुकासाठी सज्ज झाले आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघातून प्रत्येकी 50 हजार शिवसैनिकांची नोंदणी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.''

एक सिट हरल्याचे दुःख 
मी कणकवली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक नाही. धनुष्यबाण आणि शिवसेनेची मते वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे काम मी करत आहे. मागच्या निवडणूकीत कणकवली विधानसभा आमच्या हातून गेली हे अजूनही मला दुःख आहे.

- अरुण दुधवडकर, जिल्हा संपर्कप्रमुख

Web Title: Pravin Borkar comment