उदय सामंत यांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये : प्रवीण दरेकर

pravin darekar criticized on uday samant
pravin darekar criticized on uday samant

कणकवली - मुंबईतील कोरोनाग्रस्त क्वॉरंटाइन असलेल्या रूग्णांसाठी चहा, नाष्टा आणि जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती त्या ठेक्यासाठी जे दर निश्‍चित करण्यात आले होते त्यात तफावत असून हा ठेका देताना भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी व्हावी अशी माहिती विधान परिषदेेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे. खासदार नारायण राणे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन असल्याने आमदार नितेश राणे आमच्या सोबत येवू शकले नाहीत. यात कोणतीही गटबाजी नसून पालकमंत्री उदय सामंत यांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये. कोरोना संसर्ग रोग नियंत्रण आणि राज्यातील नागरीकांना सुरक्षित ठेवण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलनात उद्या (ता.22) काळ्या फिती लावून आंदोलन छेडले जाईल असे श्री. दरेकर यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीपासून मुख्यमंत्री पदावर पोहोचविण्यासाठी शिवसेनेला कोकणातील जनतेने आणि चाकरमान्यांनी पाठबळ दिले. आता त्याच चाकरमान्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी व्यवस्था नसल्याने मुंबईत रोखले जात आहे असा आरोप करून ते म्हणाले, “परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी बस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. परप्रांतीयांना मोफत सेवा आणि भूमीपुत्रांना मोफत सेवा नाही हा दुजाभाव आहे. सिंधुदुर्गात कोरोना स्वॅब टेस्टींग सेंटरसाठी विधान परिषदेच्या पाच आमदारांकडून एक कोटी रूपये जिल्हाधिकार्‍यांना भाजपच्यावतीने देत आहेत. तसे लेखी पत्र प्रत्येक सदस्याने दिले आहे. आर्थिक संकटाच्या काळात शेतकरी बागायतदारांना मदत करण्यासाठी अतुल काळसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे श्री. दरेकर यांनी सांगितले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार निरंजन डावखरे, रविंद्र चव्हाण, भाई गिरकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com