
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याला गुरुवारी (ता. १५) पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शुक्रवारीदेखील (ता. १६) पहाटेपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू होत्या. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसाचा अंतिम टप्प्यातील आंबा पिकांवर परिणाम झाला आहे. यामुळं कोकणात पर्यटनानिमित्त जाणाऱ्या लोकांनी पावसाचा अंदाज घेऊन प्रवास करावा.