Ratnagiri Maharaj Crime : समाजाला दिशा देणारा प्रवचनकारच निघाला बलात्कारी, कोकरे महाराजाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; रत्नागिरीतील घटना

Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक घटना धर्मोपदेशक कोकरे महाराज यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
Ratnagiri Maharaj Crime

समाजाला दिशा देणारा प्रवचनकारच निघाला बलात्कारी

esakal

Updated on
Summary

Highlight Summary Points

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार:

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भगवान कोकरे महाराज आणि त्यांचा सहकारी प्रीतेश कदम यांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पीडितेला धमक्या व गप्प बसविण्याचा प्रयत्न:

पीडित मुलीने सुरुवातीला प्रकार उघड करण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांच्या अनुयायांनी तिला बदनामीच्या धमक्या देऊन गप्प बसवले, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांची कारवाई आणि अटक:

खेड पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.

Ratnagiri Crime : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भारतीय दंडसंहिता, तसेच पोक्सो अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेल्यांमध्ये भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी प्रीतेश प्रभाकर कदम यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com