रसायनी प्राथमिक आरोग्य उप केंद्रात कर्मचारी नेमणुका केव्हा होणार?

लक्ष्मण डूबे 
बुधवार, 4 जुलै 2018

रसायनी (रायगड) : घेरामणिक गडाच्या डोंगर रांगातील सारसईत आदिवासी वाड्यांतील तसेच नजीकच्या इतर गाव आणि वाड्यांतील ग्रामस्थांना आरोग्याची चांगली सुविधा मिळावी त्यासाठी बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उप केंद्राची इमारत वापरा विना पडुन आहे. त्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे. 

रसायनी (रायगड) : घेरामणिक गडाच्या डोंगर रांगातील सारसईत आदिवासी वाड्यांतील तसेच नजीकच्या इतर गाव आणि वाड्यांतील ग्रामस्थांना आरोग्याची चांगली सुविधा मिळावी त्यासाठी बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उप केंद्राची इमारत वापरा विना पडुन आहे. त्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे. 

आपटा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बागेचीवाडी येथे प्राथमिक आरोग्य उप केंद्रासाठी चार वर्षा पुर्वी इमारत बांधण्यात आली आहे. कर्मचा-यांच्या नियुक्त न करताच या इमारतीची दुरावस्था होऊ लागली होती. बांधकामासाठी केलेला खर्च वाया जातो की काय आशी भिती ग्रामस्थ व्यक्त करू लागले. या बाबतची बातमी सकाळने एप्रिल 17 मध्ये  प्रसिद्ध केली होती.  त्यानंतर केंद्राच्या इमारतीला कुंपन व वरती शेड बांधण्याचे काम करण्यात आले. काम सुमारे पाच महिन्यापुर्वी झाले. मात्र प्राथमिक आरोग्य उप  केंद्रात अजुनही कर्मचा-यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या नाही त्यामुळे आदिवासी बांधव तिव्र संताप व्यक्त करत आहे. 

आपटा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बागेचीवाडी, टपोरावाडी, गोंविदवाडी, खडकीचीवाडी, सोनारवाडी, माडभवनवाडी, टोकाचीवाडी, आदि  सारसईतील आदिवासी वाडीतील तसेच चावणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कालिवली, चावणे, सवने, या गावातील तसेच  गायचरणीवाडी, पेरूचीवाडी, तुळशीमळावाडी, मोदीमळावाडी, खुटलाचीवाडी आदि  आदिवासीवाडीतील आणि  जांभिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जांभिवली, जांभिवली आदिवासी वाडी आदि ठिकानच्या ग्रामस्थांना वैद्यकीय सेवेसाठी आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रावर आवलंबुन रहावे लागत आहे. 

रुग्णांना आपटा आरोग्य केंद्रात घेऊन जाताना पाताळगंगा नदी वरील औद्योगिक क्षेत्राला जोडणा-या पुला वरून जाताना मोठा वळसा मारावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक खर्चाचा मोठा फटका बसतो आणि वेळ वाया जातो. जवळचा रस्ता आहे मात्र त्यासाठी नदी ओंलाडताना जिव धोक्यात घालुन चावणा बंधारा किंवा रेल्वे पुला वरून जावे लागते असे ग्रामस्थांनी सांगितले. जाताना ग्रामस्थांचे खुप हाल होत आहे. गैरसोयवर मात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य उप केंद उभरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. इमारत बांधुन ठेवली आहे. मात्र आरोग्य विभागाने कर्मचा-यांच्या नियुक्ती न केल्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे. 

सारसईतील वाडया, चावणा पंचक्रोशीतील गाव व वाडयांतील रूग्णांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपटा प्राथमिक रूग्णालयात  घेऊन जाताना गैरसोय होत आहे. पुलावरून रिक्षाने जाताना तीन चारशे रूपये खर्च येतो. त्यामुळे नागरिक आपटा प्राथमिक रूग्णालयात जाण्या एेवजी जवळच्या इतर खाजगी दवाखान्यात जातात. गैरसोय टाळण्यासाठी सारसईतील प्राथमिक आरोग्य उप केंद्र सुरू करावे. 
- मधुकर शिवराम पाटील, सल्लागार, कष्टकरी मुक्ती संघटना, रायगड 

Web Title: primary hospital in bad condition in rasayani raigad