
योगेश पाटील यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला होता.
सिंधुदूर्ग कारागृहात कैद्याचा का झाला मृत्यू....?
सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : येथील जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैदी राजेश गावकर यांच्या मृत्यूस तत्कालीन कारागृह अधीक्षक योगेश पाटील हे जबाबदार होते. याप्रकरणी योगेश पाटील यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला होता. त्याचेच यश म्हणून कारागृहातील एका दोषी अधिकाऱ्यावर काल (ता.6) गुन्हा दाखल झाला, अशी प्रतिक्रिया आज येथे पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिली. पाटील यांच्या अन्य आरोपांबाबत चौकशीची मागणीही मनसे करणार असल्याचे यावेळी श्री. गवंडे यांनी यावेळी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गवंडे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव विठ्ठल गावडे, मनसे परिवहन संतोष भैरवकर आदी उपस्थित होते. गवंडे म्हणाले, "20 डिसेंबरला कारागृहामध्ये राजेश गावकर यांचा मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी त्यांच्या मृत्यूस कारागृह अधीक्षक योगेश पाटील हेच जबाबदार होते. त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मनसेच्यावतीने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन दिले होते.
हेही वाचा- ही 16 धरणे घेणार आता मोकळा श्वास.....
कैदीच्या मृत्यूस कारागृह अधीक्षक जबाबदार
तत्कालीन अधीक्षक पाटील हे कैद्यांना मारहाण करणे तसेच मानसिक त्रास देणे, कारागृहातील गरीब कैद्यांना अपमानास्पद वागणूक देणे आदी गैरवर्तन करत होते. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लक्षात आल्यावर तत्कालीन कारागृह अधीक्षक पाटील यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी तसेच कैदी राजेश गावकर यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल होऊन शिक्षा व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता.
हेही वाचा- सावधान ! अधिकाऱ्यांची पर्ससीन नौकांवर होणार कारवाई...
आंदोलन स्थगित करण्यात आले
या प्रकरणात मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलनही करण्याचा इशारा देण्यात आला. यानंतर मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी तत्कालीन कारागृह अधीक्षक पाटील यांची कसून चौकशी सुरू असून पंधरा दिवसात कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत घंटानाद आंदोलन मागे घेण्याविषयी सुचविले होते. यानंतर मनसेच्या वतीने छेडण्यात येणारे 26 जानेवारीचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
हेही वाचा- या महापालिकेत संगनमताने होते पाप...
पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल
मनसेच्या याच पाठपुराव्यामुळे कारागृह अधीक्षक पदाची सूत्रे काढून योगेश पाटील यांची पुणे येरवडा येथे त्यांची बदली करण्यात आली आणि त्याचाच एक भाग म्हणून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील याच्या कारागृहातील कारभाराची चौकशी होऊन त्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मनसे पाठपुरावा करणार आहे.''
हेही वाचा- कारागृहातील या प्रकरणामुळे या बंदीजनांवर झाला गुन्हा दाखल...
महामोर्चाला सिंधुदुर्गातून कार्यकर्ते
श्री. गवंडे म्हणाले, "9 फेब्रुवारीला मुंबई येथे पाकीस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हलवण्यासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सावंतवाडी शहरातून मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते सहभागी होतील.''