'या' महापालिकेत संगनमताने होते पाप... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur Less rented  fraud  in Municipality kolhapur marathi news

क्षेत्रफळ कमी दाखवून संबंधित मालकाला घरफाळा कमी करून देण्यात तोडपाणी करणारे कोण? याचाही उलघडा यानिमित्ताने होणार आहे.

'या' महापालिकेत संगनमताने होते पाप...

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागात घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर या चौकशीतील एकेक प्रकरणे बाहेर येत आहेत. शहरातील एका बड्या सराफी दुकानाचे क्षेत्रफळ कमी करून इमारतीला कमी घरफाळा आकारला आहे. या इमारतीतील चार गाळ्यांपैकी एका गाळ्यालाच करआकारणी झाली असून उर्वरित तीन गाळेच रेकॉर्डवर आणले नसल्याची माहिती पुढे आली आहे. यांसारख्या शेकडो प्रकरणांचा उलगडा नजीकच्या काळात होईल. या नामांकित सराफी दुकानाच्या कंपनीला सद्यःस्थितीत ४४ हजार इतका घरफाळा असून योग्य मोजमाप झाले तर हा घरफाळा दोन लाखांपर्यंत जाऊ शकतो.

क्षेत्रफळ कमी दाखवून संबंधित मालकाला घरफाळा कमी करून देण्यात तोडपाणी करणारे कोण? याचाही उलघडा यानिमित्ताने होणार आहे. हा अहवाल येत्या आठ दिवसांत सर्वांसमोर येणार आहे.घरफाळा आकारणीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समिती, तसेच शिवसेना यांनी केला आहे. या तक्रारीनंतर चौकशी सुरू केली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची हमी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.

हेही वाचा- .. तर सरकारी नोकऱ्या सोडून द्या

तोडपाणी करणारे कोण?

महापालिकेच्या घरफाळा विभागातील भ्रष्ट कारभाराची पाळेमुळेच शोधून काढण्याचे आव्हान आयुक्तांसमोर आहे. मध्यंतरी आयुक्त पी. शिवशंकर असताना त्यांनी या विभागाचे कामकाज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यासाठी सायबरटेक कंपनीची नेमणूक केली होती. ही कंपनी शहरातील मिळकतींची मोजणी करण्यासाठी नेमलेली कंपनीने मात्र यामध्ये मोठा घोळ घातला. कोट्यवधी रुपये कंपनीला देऊनही महापालिकेला अपेक्षित असणारे सर्वेक्षण आणि माहिती मिळालीच नाही.

हेही वाचा- सातबाऱ्यावर येणार पून्हा पिकपाहणी रकाना

चार गाळ्यांपैकी एका गाळ्यालाच करआकारणी

काम अर्धवट असले तरी २०१६ मध्ये महानगरपालिकेने मिळकती मोजण्यासाठी सायबर टेक पुणे कंपनीला जीआयएस म्हणजेच जिओ ग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम राबवण्याचे काम दिले होते. हे काम वर्षांत पूर्ण करण्याचे होते. आतापर्यंत कंपनीला १ कोटी ४० चाळीस लाख रुपये रक्कम फी म्हणून आदा केली आहे. एकूण कामाची किंमत ३ कोटी २५ लाख रुपये इतकी आहे. या कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे सत्तर टक्के काम पूर्ण केले आहे. महापालिकेने त्याची तपासणी केली असता त्यातले तीस टक्के काम अपूर्ण आहे तसेच अनेक चुका झाल्याचीही माहिती आहे.

हेही वाचा- मनपाचे प्रभाग होणार अपडेट

भ्रष्ट कारभाराची झळ
या कंपनीला त्यांनी न केलेल्या कामासाठी, चुकीच्या कामासाठी, अपूर्ण कामासाठी किमतीपेक्षा जास्त रक्कम आदा केली आहे; परंतु या मोठ्या घोटाळ्याकडे महापालिकेच्या प्रशासनाने हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या घरफाळा विभगातील घोटाळे थांबावेत, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरले; पण त्यातही भ्रष्टपध्दतीच वापरल्याने त्यालाही भ्रष्ट कारभाराची झळ बसली आहे.

टॅग्स :Kolhapur