Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीत चेकपोस्ट स्थिर देखरेख पथकात प्राध्यापकांची दमछाक

अमित गवळे
बुधवार, 27 मार्च 2019

पाली - लोकसभा निवडणुकीशी सबंधीत कामकाजात वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना चेकपोस्ट स्थिर देखरेख पथकात समविष्ठ करुन वेठीस धरले जात असल्याचे समोर आले आहे. सलग 12 तास दिवस रात्र-पाळीच्या रुपाने प्राध्यापकांवर जबाबदारी सोपवल्याने पदवी व पदव्युतर विद्यार्थ्यांचे अपरिमीत शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात प्राध्यापकवर्गाने निवडणुकीच्या कामकाजातून सुट मिळावी या मागणीचे निवेदन पाली सुधागड तहसिलदार दिलीप रायन्नावर यांना दिले आहे. 

निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाल्याने याबाबत अद्यापर्यंत कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेतला गेलेला नाही. आदर्श आचारसंहिता राखण्याच्या दृष्टीकोणातून एफ.एस.टी, एम.सी.सी, एस.एस.टी/एफ.एस व वि.वि.टी अशास्वरुपाची पथके निर्माण करण्यात आली आहेत. सदर पथकातील कर्मचारी व अधिकार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा अथवा सुरक्षा पुरविण्यात आली नसल्याची ओरड सुरु आहे. विशेषतः देखरेख पथकात जिल्ह्यातील पेण व सुधागडच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सर्वाधिक समावेष आहे. या पथकात एस.एस.टी प्रकारात प्राध्यापकांचा समावेष असून प्राध्यापकांना दिवसा व रात्री रस्त्यावर उभे राहून वाहने थांबवून तपासणी करण्याचे काम सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांसमोर परिक्षा तोंडावर आलेल्या असताना उवर्वीत अभ्यासक्रम पुर्ण कसा करावा? असा गहन प्रश्न पडला आहे. याबरोबरच दुसर्‍या बाजूला शासनाने सोपविलेले स्थीर देखरेख पथकाचे काम कसे करावे अशा द्विधा मनस्थितीत प्राध्यापक सापडलेले आहेत. यावर सबंधीत प्रशानामार्फत योग्य तो निर्णय घेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोणातून प्राध्यापकांना निवडणुकीच्या कामकाजातून सुट देऊन  सुशिक्षीत बेरोजगारांना हे काम देण्यात यावे अशीही मागणी होत आहे. 

शैक्षणिक नुकसान आणि दमछाक
महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापकांना 11 मार्च पासून थेट निवडणुकीच्या कामकाजाला जुंपले असल्याने वर्गातील तासिकांवर थेट परिणाम झाला आहे. तसेच प्राध्यापक महाविद्यालयात नसल्याने विद्यार्थी महाविद्यालयाकडे पाठ फिरवीत आहेत. त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापकांना विविध विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याबाबतचे आदेश मुंबई विद्यापिठाकडून आले आहेत. त्यामुळे प्राध्यापक वर्गाची चांगलीच दमछाक व कसरत होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The professors have been entrusted with the checkpost in the stationary monitoring team