शेतकरी संघटनेचा उद्यापासून धरणे आंदोलनाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

सांगली- शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (ता.20) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत संघटनेचे तासगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा भाव देता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. गेल्या 25 वर्षांत सुमारे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

सैनिकांच्या वीरमाता व पत्नींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करून त्यांना कठोर शिक्षा करावी, शेतकऱ्यांना वीज बिल व कर्जमुक्त करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, म्हैसाळ, ताकारी, टेंभू, आरफळ पाणी योजना बारमाही करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी मिळावे, बैलगाडी शर्यतीवरील बंदी तातडीने उठवावी, शेतकरी विरोधी कायेद रद्द व्हावेत. या मागण्यांबाबत आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक माने, रमाकांत पाटील, रणजित माने, अशोक शिंदे, संभाजी पवार यांच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत. 

Web Title: Protest by Shetkari Sanghatna