म्हणून त्या 6 व्यक्तींना गावाच्या बाहेर केले क्वारंटाईन अन्...

 quarantine 6 person in wayangani
quarantine 6 person in wayangani

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : वायंगणी परिसरातून आंबा वाहतूक करणारा चालक हा कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाने, आरोग्य विभागाने तातडीने याबाबत ठोस पावले उचलून त्या व्यक्तीच्या कुटुंबातील आलेल्या 6 व्यक्तींना गावाच्या दूर व सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन केले आहे. शिवाय परिसराला कंटेन्मेंट झोन जारी करून दुकाने, रहदारी यावर निर्बंध आणले आहेत.


दरम्यान संबंधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या योग्य त्या वैद्यकीय तपासण्या कराव्यात, अशी मागणी वायंगणी ग्रामपंचायतीमार्फत सरपंच सुमन कामत यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 3 वर पोचली आहे. वायंगणी परिसरातील आंबा वाहतूक करणार्‍या वाहनांवर चालक असलेल्या व्यक्तीचे रिपोर्ट काल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती.

यामुळे वायंगणीसह दाभोली, खानोली, केळूस ग्रामपंचायत क्षेत्र आणि वेंगुर्ले शहर हे कंटेन्मेंट झोनमध्ये येत आहे. यामुळे आज या क्षेत्रातील सर्व दुकाने बाजार व लोकांच्या रहदारीवर पूर्ण निर्बंध घालण्यात आलेले आहेत. कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबात एकूण 6 व्यक्ती असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज येथील तहसील कार्यालयात भेट देऊन तहसीलदार प्रविण लोकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्‍विनी माईणकर, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे व प्रशासकीय इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन आढावा घेतला. वायंगणी गावात जाऊन पाहणी केली. प्रशासनाने, आरोग्य विभागाने तातडीने याबाबत ठोस पावले उचलून त्या व्यक्तीच्या कुटुंबातील आलेल्या 6 व्यक्तींना गावाच्या दूर व सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करावं व त्यांच्या योग्य त्या वैद्यकीय तपासण्या कराव्यात, अशी मागणी वायंगणी ग्रामपंचायत मार्फत सरपंच सुमन कामत यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com