आंबोलीत दोन गटांत हाणामारी; कर्नाटकातील युवकांवर गुन्हा दाखल

आंबोलीत दोन गटांत हाणामारी; कर्नाटकातील युवकांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी - सुकळवाड (ता. मालवण) व कर्नाटक येथील दोन युवकांच्या गटात आंबोली कावळेसाद येथे हाणामारीचा प्रकार घडला. सुकळवाड येथील तरुणांना मारहाण करून कर्नाटकातील तरुणांनी पळ काढला. हा प्रकार गुरूवारी (ता.3) सायंकाळी 5 वाजता घडला.

याबाबत सुकळवाड येथील तरुणांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून कर्नाटक येथील युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 6 लाख 24 हजार रुपयांच्या सोन्याच्या साखळ्याही हिसकावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. क्षुल्लक कारणावरून हा वाद रंगला व त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

कर्नाटकमधील हे युवक मद्यधुंद अवस्थेत होते. या पर्यटकांकडून मालवण येथील युवकांच्या गटावर हल्ला करण्यात आला.  याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सीताराम पावसकर याने दिली. युवकांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण येथील युवक कावळेसाद पॉईंटवर मौजमजा करून कावळेसाद पॉईंट येथे पार्किंगमध्ये परतण्यासाठी थांबले होते.

यावेळी त्याठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या कर्नाटक येथील पर्यटकांनी त्यांची मस्करी करण्यास सुरुवात केली व शिवीगाळ केली. याबाबतची विचारणा केल्यानंतर थेट लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात ते जखमी झाले. तशाच अवस्थेत त्यांनी चंदगडपर्यंत पाठलाग केला; परंतु ते पळून जाण्यास यशस्वी झाले. 

सुकळवाडचे युवक जखमी 
हाणामारीत सुकळवाड येथील चौघे युवक जखमी झाले. त्यांना तातडीने येथील कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना गंभीर दुखापत झाली. सीताराम सत्यवान पावसकर (वय 31), मनोज मधुकर वायंगणकर (वय 28), विक्रम प्रकाश मुरकर (वय 28), परेश गुरुनाथ बांदेकर (वय 22), चेतन प्रमोद मुसळे (वय 32, सर्व रा. सुकळवाड ता. मालवण) अशी जखमींची नावे आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com