Raigad : माणगाव शहरात मगरीचा थरार ; वनविभाग, पोलीस व कोलाड रेस्क्यू टीम तर्फे बचावकार्य

मगरीला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
Raigad
Raigad Sakal

पाली - माणगाव कचेरी रोड येथील मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स समोर गुरुवारी (ता.20) रात्री 11:30 च्या सुमारास एक सात फूट लांबीची अजस्त्र मगर रस्त्यावर मुक्त संचार करतांना दिसली. माणगाव शहरात अशा प्रकारे पहिल्यांदाच भर वस्तीत रस्त्यावर मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

शिवाय बघ्यांची खूप मोठी गर्दी जमली आणि झुंबड उडाल्याने तणावात येऊन हि मोठ्या आकाराची मगर तेथील समोरीलच ओम अपार्टमेंट येथे आतमध्ये शिरली. मात्र वनविभाग, पोलीस व कोलाड रेस्क्यू टीम तर्फे बचावकार्य करून या मगरीला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Raigad
Mumbai News : मुंबईतील दरडींच्या दाढेतील 22 हजार झोपड्यांवर भितीचे सावट

माणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस रामनाथ डोईफोडे, मयूर पाटील, भरत वामन, विकास शिंदे, प्रणव लांडे, युवराज दहिफळे आणि विनय पाटील यांनी सदर ठिकाणी तात्काळ धाव घेत गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला.

माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांनी तात्काळ धाव घेत एकंदरीत परिस्थिती पाहून मगर पाहण्यासाठी आलेल्या उत्साही मंडळींना मगरी पासून दूर ठेवून कोणालाही हानी पोहचू न देता परिस्थिती नियंत्रणात आणली, वार्ड क्र ६ मधील नगरसेविका हर्षदा काळे आणि सामाजिक कार्यकर्ते सुमित काळे, सर्पमित्र शुभम पाटील आणि केदार जाधव तसेच जमलेल्या अनेक सुज्ञ तरुणांनीदेखील लोकांना आवरण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

Raigad
Pune : पुणे जिल्ह्यातील ३५५ शाळांना दोन दिवस सुट्टी

रोहा उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत व सहायक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिदुद्ध ढगे वनरक्षक अनिल मोरे आणि वैशाली भोर, वाहन चालक विवेक जाधव,

सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाड चे सागर दहिंबेकर, निलेश लोखंडे, सुरज दहिंबेकर, प्रणय सागवेकर, श्वेता विश्वकर्मा, प्रयाग बामुगडे, अजय राजीवले आणि माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्या सहकार्याने मगरीचे सुखरूप बचाव कार्य करण्यात आले. ओम अपार्टमेंट येथून सुखरूप पकडून माणगाव काळ नदीत सुरक्षित ठिकाणी मगरीला रात्री 1 वाजता सोडण्यात आले.

Raigad
Pune : पुणे जिल्ह्यातील ३५५ शाळांना दोन दिवस सुट्टी

थरार

रात्री साधारण सव्वा बाराच्या च्या सुमारास कोलाड येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे बचाव पथक दाखल झाल्यानंतर सागर दहिंबेकर याच्या नेतृत्वात कोणताही धोका न होता.

योग्य ती काळजी घेत नियोजन करून अथक प्रयासाने मगरीला कोणत्याही प्रकारची इजा न होऊ देता शिताफीने पकडले आणि त्याच वेळी उपस्थित जमावाने जोरदार टाळ्या वाजवून या टीमचे, माणगाव पोलिसांचे व शंतनू कुवेसकर यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

Raigad
Mumbai News : मुंबईतील दरडींच्या दाढेतील 22 हजार झोपड्यांवर भितीचे सावट

सध्या पूर परिस्थिती असल्यामुळे अनेक वन्यजीवांचे वाताहत होऊन भर वस्त्यांमधून त्यांचा वावर आढळून येतो, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी भयभीत न होता वन्यजीवाला कोणतीही हानी न पोहोचवता स्थानिक वनविभागाला त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांनी केले आहे.

वन्यजीवांच्या बचावकार्यात लोकांच्या विनाकारण गर्दीमुळे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे बचाव करणाऱ्यांसाठी वन्यजीवांसोबत जमलेल्या गर्दीतील माणसांच्या सुरक्षिततेचा देखील विचार करावा लागतो.

वन्यजीवांच्या बचाव कार्यादरम्यान लोकांनी समजून घेऊन संयमाने बाजूला राहून बचावकर्त्यांना त्यांचे काम योग्य त्या पद्धतीने करू द्यावे असे आवाहन वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com