Pali News : रायगडच्या शाळांमध्ये 'तेजस' उपक्रमातून इंग्रजी शिक्षणाची क्रांती! टॅग समन्वयकांचा दिमाखदार गौरव सोहळा संपन्न; सुधागडच्या शिक्षकांचा डंका

रायगड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत (DIET) 'तेजस' उपक्रमांतर्गत इंग्रजी शिक्षणात क्रांती घडवणाऱ्या तालुका व केंद्र समन्वयकांचा कामोठे येथे गौरव करण्यात आला.
Tejas Initiative: Elevating English Education in Raigad Primary Schools

पाली, टॅग तालुका व केंद्र समन्वयकांचा गौरव प्रसंगी उपस्थित मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)

Sakal

Updated on

पाली : रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या 'तेजस' (TAG) उपक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या तालुका व केंद्र समन्वयकांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रायगड यांच्या वतीने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com