

poiled paddy creates fodder crisis for Raigad farmers
sakal
पाली : परतीच्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. अनेकांचे उभे भातपीक शेतातच कुजले तर काहींचा भात पुन्हा उगवला. मात्र या सगळ्यांमध्ये भात झोडणी झाल्यावर निघणारा पेंढा उरलाच नसल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे बळीराजा आणि पशुपालक प्रचंड चिंतेत आहेत. काहीजणांना उरला सुरलेला भात हाती आला मात्र, भिजलेला भात काळा पडला आहे. त्यामूळे त्यास बाजारात अत्यल्प किंमत मिळेल. तसेच भिजलेल्या पेंढ्यामुळे गुरांची वैरण गेली आहे.