Raigad News : मानव-बिबटया संघर्ष रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; नागरिकांच्या सहकार्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाह!

Human Leopard Conflict : रायगड जिल्ह्यात मानव-बिबटया संघर्ष कमी करण्यासाठी प्रशासन, वन विभाग व पोलीस यंत्रणा संयुक्तपणे उपाययोजना राबवत आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
Administration’s Preventive and Protective Measures

Administration’s Preventive and Protective Measures

Sakal

Updated on

पाली : वन्य प्राण्यांचा हल्ला होवू नये, याकरिता नागरिकांना सतत जागरूक केले जात आहे. या सर्व उपाययोजना जिल्ह्यातील वन विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन, संयुक्त वनव्यवस्थापन समित्या, महसूल, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून, सहकार्याने प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. तरी या सर्व प्रक्रियेत मानव-बिबटया संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बुधवारी (ता. 17) केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com