वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेला पन्नास पुस्तकांची भेट

अमित गवळे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

प्रत्येकाच्या अायुष्यात पुस्तकांमुळे अमुलाग्र बदल घडतो. त्यामुळे वाचन संस्कृती टिकली व जोपासली पाहिजे. यासाठी विदयार्थी दशेत व लहानपणा पासूनच मुलांना दर्जेदार पुस्तके व वाचन साहित्य सहज उपलब्ध झाले पाहिजे. म्हणूनच शाळेला चांगल्या पुस्तकांची भेट दिली आहे.

पाली : सुधागड तालुक्यातील रा.जि.प.प्राथमिक शाळा नागशेत येथे शुक्रवारी (ता.१३)वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक मयूर कारखाणीस यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शाळेला पन्नास उत्कृष्ठ पुस्तकांचा खजिना भेट दिला.

यावेळी कारखाणीस यांनी उपस्थित विदयार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून सांगितले. वाचन हे अापले अायुष्य समृद्ध बनविते. प्रत्येकाच्या अायुष्यात पुस्तकांमुळे अमुलाग्र बदल घडतो. त्यामुळे वाचन संस्कृती टिकली व जोपासली पाहिजे. यासाठी विदयार्थी दशेत व लहानपणा पासूनच मुलांना दर्जेदार पुस्तके व वाचन साहित्य सहज उपलब्ध झाले पाहिजे. म्हणूनच शाळेला चांगल्या पुस्तकांची भेट दिली आहे. असे मयुर कारखाणीस यांनी सकाळला सांगितले. 

या कार्यक्रमात मयुर कारखाणीस यांच्या समवेत केंद्र प्रमुख उल्हास गावंड तसेच शाळेचे मुख्याध्यापक धुळगंडे सर, शिक्षक भागवत सर, ठाकूर मॅडम, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. कारखाणीस यांनी शाळेस उत्कृष्ठ पुस्तके भेट दिल्याबद्दल केंद्रप्रमुख, शालेय व्यवस्थापन समिती,शिक्षक व विदयार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक शिक्षक भागवत सर यांनी केले.

Web Title: Raigad news book in school