Raigad News : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पश्चिम बंगालमधून चौघांना अटक; ३२ लाखांचा गंडा
raigad
raigad sakal

अलिबाग - अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ३२ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील चौघांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेतले. टोळीतील तिघेजण अद्याप फरार असून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून २० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. चौघांना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सौरभ सौम्य दास (४३), सोमेन सुधांशू मन्ना (३३), सोमेश बिरेंद्रनाथ बिरा (२७) आणि अभिषेककुमार दिलीप रज्जाक (२२) अशी अटक झालेल्या चौघांची नावे आहेत. अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून या टोळीने कोल्हापूर येथील अभिजित आप्पासाहेब वानिरे यांच्याकडून ३२ लाख ५० हजार रुपये अलिबाग येथील एका हॉटेलमधून घेतले होते.

टोळीतील आरोपींनी या पूर्वी कधीही अलिबाग पाहिले नव्हते किंवा त्यांची वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांबरोबर ओळखही नव्हती; परंतु महाविद्यालयातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्‍याचे सांगून मुलीला प्रवेश मिळवून देतो असे मोबाईलवर सांगून विश्वास संपादन केला होता.

raigad
Raigad : वादळामुळे नौका समुद्रकिनारी ; हवामान विभागाचा ४८ तासांचा अलर्ट; गुजरातच्या बोटीही आश्रयाला

मुख्य आरोपी सोमेन सुधांशू मन्ना यांनी इंटरनेटवरून एनबीबीएस प्रवेशाची प्रतीक्षा यादी मिळवली. यादीतील कोणत्या विद्यार्थ्यांचे पालक गळाला लागतील, याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला. यातील अभिजित आप्पासाहेब वानिरे यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवल्‍यावर त्‍यांना अलिबाग येथे बोलावले; परंतु अलिबागमध्ये कसे यायचे, हेही आरोपींना माहिती नव्हते. गुगल मॅपवरून खासगी वाहनाने अलिबागला आल्‍याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

raigad
Solapur News : चिंचोली एमआयडीसी हाउसफुल्‍ल; १५१ हेक्टरचे भूसंपादन

अलिबागमध्ये वैद्यकीय महाविद्यालय शोधून सापडले नाही. शेवटी त्यांनी जिल्हा रुग्णालयासमोरच्या टपरीवर वानिरे यांना बोलावले, तेथे त्यांची ओळख झाली. पैसे घेण्यासाठी नंतर एका हॉटेलमध्ये नेले. २७ सप्टेंबर रोजी पैसे घेतल्यानंतर आरोपींनी लगेचच मोबाईल बंद करून परतीचा प्रवास सुरू केला. संशय आल्यानंतर वानिरे यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

खासगी वाहनाने हे आरोपी पश्चिम बंगालमध्ये पोहचले नव्हते त्या पूर्वीच रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरिक्षक विशाल शिर्के, हवालदार अमोल हंबीर, प्रतीक सावंत, सचिन वावेकर हे विमानाने पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले होते. जीपीएस लोकेशनवरून आरोपी हैद्राबादमार्गे ओडिशाच्या दिशेने जात असल्याचे समजल्यावर आरोपींना वाटेतच गाठून अटक केली.

raigad
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

मुख्य आ मुख्य सूत्रधार सोमेन मन्ना प्रवेशासाठी आणि नंतर नोकरीसाठी झाली होती. त्‍यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक पाल्‍य आणि त्‍यांचे पालक गळाला लागू शकतात, असे समजल्यावर सोमेनने इंटरनेटवरून महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात सर्व माहिती मिळवली. मराठी भाषा येत नसल्याने त्याने प्रभावी इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तीला गाठले. सर्वांच्या बोलण्याचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या पालकांवर पडायचा. मात्र पहिल्याच प्रयत्नात त्यांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळींने अन्य कोणाची फसवणूक झाली आहे का, याची चौकशी रायगड पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com