

Indian Innovator from Raigad Shines at NASA Global Event
Sakal
पाली : पाली शहरातील भारतीय इनोव्हेटर प्रतीक अरुणा प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संघ ऍस्ट्रो स्वीपर्स यांना नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेज २०२५ मधील प्रतिष्ठित गॅलेक्टिक इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रतिकने ऍस्ट्रो स्वीपर्स संघाचे दमदारपणे नेतृत्व करत अवकाशाला गवसनी घालणारी दमदार कामगिरी केली आहे. या संघाने कचरा व्यवस्थापन आणि अवकाश शाश्वततेसाठी अभिनव फ्रेम वर्क केले सादर केले. त्याच्या या उल्लेखनीय रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र व देशाच्या शिरपेचात ही मानाचा तुरा खोवला गेला आहे.