दरड कोसळली ; कोंकण रेल्वे मार्गावरील या पाच गाड्या मिरजमार्गे वळवल्या

राजेश कळंबटे
Thursday, 6 August 2020

 

गोवा राज्याच्या सीमेवर रेल मार्गांवर हा टनेल आहे.  

 

रत्नागिरी  : कोकण रेल्वे मार्गावर पेडणे  बोगद्यात दरड
कोसळल्याने रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. या गाड्यातून प्रवास करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.या मार्गावरील एर्नाकुलम, हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल, लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस,  या गाड्या पनवेल- पुणे- मिरज- लोंडा मार्गे मडगाव अशा वळविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- रत्नागिरीत चाकरमान्यांच्या प्रवेशासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची सूचना... -

दरड कोसळल्याचा प्रकार मध्यरात्री लक्षात आला.  त्यानंतर  प्रशासनाने वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.  गोवा राज्याच्या सीमेवर रेल मार्गांवर हा टनेल आहे.  सध्या कोविड 19 मुळे कोकण रेल्वे मार्गावरील बाहुतांशी वाहतूक बंद करण्यात आली आहे.  पाच गाड्या या मार्गावरून सोडण्यात येतात.  परराज्यातून येणाऱ्यांना याचे तिकीट दिले जाते.  सध्या या गाडयांना तुरळक गार्डी असते.

हेही वाचा- रत्नागिरीत जयगड कळझोंडी पुलाचा भाग ढासळला, घराला गेले तडे -

 पेडणे येथील दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून अद्यापही किती कालावधी लागेल हे सांगणे अशक्य आहे. सध्या  चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी परतत आहेत.  पण रेल्वे बंद असल्यामुळे महामार्गाचा उपयोग करून ते गावी परतत आहेत.

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway traffic jam konkan railway line pain fell in the Pedne tunnel