esakal | कोकणात चार दिवस अतिमुसळधारेचा इशारा; नागरिकांना सतर्कतेच्या सुचना
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall in vidarbh region till next week

चार दिवस अतिमुसळधारेचा इशारा; नागरिकांना सतर्कतेच्या सुचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच असून अजून चार दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पावसाचा जोर १९ जुलैपर्यंत राहील, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. संततधारेमुळे रत्नागिरीत काजळीसह हातखंबा येथील नदीला पूर आला होता.

गुरुवारी (ता. १५) सकाळ ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी ८९.०७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड १०२.१०, दापोली ८९.२०, खेड ७०.७०, गुहागर ९४.८०, चिपळूण ७०.४०, संगमेश्वर ६७.६०, रत्नागिरी ८६.५०, राजापूर ९९.६०, लांजा १२०.७० मि.मी.ची नोंद झाली आहे. बुधवारी रात्रभर पावसाचा धुमाकूळ सुरू होता. सकाळी रत्नागिरीत उघडीप घेतली होती; परंतु दुपारी पुन्हा पावसाला सुरवात झाली. त्यामुळे हातखंबा येथील नदीला पूर आला होता. पाणी किनाऱ्‍यावरील घरांच्या बांधापर्यंत आले होते. काजळी नदीचेही पाणी वाढत असल्यामुळे चांदेराई बाजारपेठेतील व्यावसायिकांकडून काळजी घेण्यात येत होती. सायंकाळी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नद्यांचे पाणी ओसरले.

हेही वाचा- सिंधुदुर्गात पावसाची संततधार ओसरेना; समुद्रही खवळला

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार,

दापोली गरदे येथील रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती. उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने १९ हजार ६०० रुपयांचे, शंकर जानू गोरे यांच्या घराचे ८ हजार, जनार्दन देवजी धोपट यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. गुहागर तालुक्यात वारदईतील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे पावसामुळे ३ लाख ५५ हजाराचे तर संगमेश्वर ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे २७ हजार ६०० रुपये, कोळंबेतील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा पावसामुळे बांध पडल्याने घराचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले.

loading image