Raj Thackeray: राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला; राज ठाकरे यांची टीका, १५ वर्षांपासून मुहूर्त नाही

Raj Thackeray Slams Delay In Mumbai Goa Highway Project: राजकीय हस्तक्षेप, टक्केवारीच्या राजकारणामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम १५ वर्षांपासून रखडले; खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर सणासुदीत पुन्हा प्रवाशांना त्रास, विकासाच्या नावाखाली स्थानिकांवर अन्याय असल्याची राज ठाकरे यांची टीका
Raj Thackeray

Raj Thackeray

sakal

Updated on

माणगाव (जि. रायगड) : ‘‘आपल्याकडे विकासकामांपेक्षा टक्केवारीचा विचार अधिक केला जातो. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे,’’ असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. रायगड दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांच्या हस्ते माणगाव येथे मनसेच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com