भाजपकडुन कोकणात लोकसभेसाठी सुरेश प्रभूंचेच नाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

" वाळुचे लिलाव होवून सुध्दा पुढची प्रकीया पुर्ण होत नाही, त्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांचा काय इंटरेस्ट आहे का? "

सावंतवाडी - लोकसभेची उमेदवारी भाजपकडून सुरेश प्रभुंना देण्यात यावी, अन्य कोणाचा या ठिकाणी विचार नको असा मतप्रवाह पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यात आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून विचार करण्यात यावा, असा ठराव जिल्हा भाजपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. सावंतवाडीत तालुक्यातून त्याची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली 

पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या काळात झालेला अपूर्ण कामांचा पाढा संबंधित मंत्र्यांकडे वाचणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री तेली यांनी आज येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी संदीप हळदणकर उपस्थित होते. तेली म्हणाले जिल्हा भाजपकडून येणाऱ्या लोकसभेसाठी सुरेश प्रभू यांनाच उमेदवारी देण्यात यावी. अन्य कुणाचा विचार करण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे. त्यानुसार आवश्‍यक असलेले ठराव घेण्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार सावंतवाडी कार्यकारणीच्या बैठकीत याची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व बाबी वरिष्ठांकडे मांडण्यात येणार आहेत

पालकमंत्री मंत्री केसरकर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहेत.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे या बाबतची तक्रार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करणार असून संबंधित कामाला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले तिलारी प्रकल्पात ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने झाला याची चौकशी व्हावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करणार आहे तसेच बांदा येथे अनेक वर्षे रखडलेल्या आरोस बाग पुलाचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी बबनराव लोणीकर  पुढच्या आठवड्यात जिल्ह्यात येत आहेत. 

केसरकरांचा  'इंटरेस्ट' काय 
यावेळी तेली म्हणाले जिल्ह्यात वाळूचा लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु अद्यापपर्यंत लोकांना वाळू मिळत नाही दुसरीकडे वाघोटण येथील खाडीत बेकायदेशीररित्या ट्रेझर ने वाळू उपसा सुरू आहे. ती वाळू चढ्या भावाने विकली जात आहे त्यामुळे या सर्व प्रकरणात पालकमंत्री दीपक केसरकरांचा  इंटरेस्ट आहे की काय असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला

Web Title: Rajan Teli comment on Lok Sabha constituency