राजापूर मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी

राजापूर मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी

लांजा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने इच्छुक उमेदवारांनीही मतदारसंघात फिरायला सुरवात केली. राजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्‍यता असून बहुरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजित यशवंतराव यांनी आधीच निवडणूक लढविणार, असे घोषित केले असून सतत या मतदारसंघात संपर्क ठेवला आहे. मात्र, कोणत्या पक्षातून निडणूक लढविणार, हे त्यांनी जाहीर केलेले नाही. काँग्रेसकडून अविनाश लाड यांनी संपर्क ठेवण्यास सुरवात केली आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर मतदारसंघात दौरे करीत आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून राजन देसाई, तर भाजपकडून प्रसाद पाटोळे, उल्का विश्वासराव यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार राजन साळवी यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे. ते मोडून काढण्यासाठी इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. काँग्रेस, भाजप, स्वाभिमान नेते, शिवसेना आमदारांविरोधात उतरल्याचे दिसते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com