रिफायनरी मुद्द्यावरून पालिका राजकारण तापणार? सेना-काँग्रेस आमनेसामने

नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीचे ढोल आतापासूनच जोरदारपणे घुमू लागलेत
Shivsena-to-Congress
Shivsena-to-CongressE-Sakal
Summary

नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीचे ढोल आतापासूनच जोरदारपणे घुमू लागलेत

राजापूर - नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीचे ढोल आतापासूनच घुमू लागले आहेत. राज्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस (Congress) यांची एकत्रित महाविकास आघाडी असली तरी येथील नगर पालिकेमध्ये एकमेकांचे विरोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे गेली पाच वर्ष सत्ताधारी आणि विरोधक म्हणून एकमेकांवर कुरघोड्या करणारे शिवसेना (Shivsena) आण काँग्रेस महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Sarkar) म्हणून एकत्रित निवडणूक लढवणार की प्रत्येक स्वतःची ताकद आजमावणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सतरा नगरसेवक संख्या असलेल्या येथील नगर पालिकेमध्ये मावळत्या संख्याबळाचा विचार करता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बहुमताच्या जोरावर सत्ता होती. तर, शिवसेना विरोधी बाकावर होती. या मावळत्या सभागृहामध्ये १७ नगरसेवकांपैकी शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसवेकाचे अकाली निधन झाले. त्यामुळे सदस्य संख्या पंधरावर येऊन ठेपली. त्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आठ तर विरोधी गट असलेल्या शिवसेनेकडे सात सदस्यसंख्या राहिली आहे. यामध्ये रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्याप्रकरणी हकालपट्टी केलेल्या प्रतीक्षा खडपे यांच्याही सदस्यसंख्येचा समावेश आहे.

Shivsena-to-Congress
कणकवली : यांत्रिकी मासेमारीमुळे कासवांना धोका

नगर पालिकेच्या (Election 2022) आगामी निवडणुकीचे ढोल आतापासूनच जोरदारपणे घुमू लागले आहेत. या निवडणुकीची प्रशासनाकडून जोरदारपणे पूर्वतयारी सुरू झाली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंतिम प्रभागरचनेवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात होणार आहे. राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शिवसेना आणि अन्य मित्रपक्ष एकत्र येत त्यांनी भाजप विरोधात महाविकास आघाडीची मोट बांधली आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करता येथील पालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरोधात शिवसेना अशी राजकीय स्थिती राहिली आहे.

पालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणकोणते राजकीय पक्ष एकत्र येत आघाडी करणार, कोणते पक्ष स्वबळाची ताकद आजमावणार ? याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी काँग्रेस-शिवसेना एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वतंत्रपणे आपापल्या पक्षाची ताकद आजमावणार ? याचीही साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. सद्यःस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरील राजकारणाला प्राधान्य देत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरूद्ध शिवसेना अशी लढत होण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून दिले जात आहेत. तशी चर्चा आणि मोर्चेबांधणी शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटामध्ये दिसत आहे.

Shivsena-to-Congress
रवी राणांना आर. आर. आबांची आठवण, गुन्हा दाखल केल्यावरून आक्रमक

'नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी करायची की नाही, त्याचवेळी स्थानिक पातळीवरील आघाडीला प्राधान्य द्यायचे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. वरिष्ठांचा सल्ला आणि मार्गदर्शनानुसार योग्यवेळी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.'

- हुस्नबानू खलिफे, काँग्रेस माजी आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com