नातवाचा आजोबांना तीन लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

राजापूर - आजोबांचे एटीएम कार्ड लांबवून पिन क्रमांकाच्या मदतीने तीन लाख चार हजार रुपये लांबवून नातवाने विविध वस्तू खरेदी करत "जिवाची मुंबई' केली. या प्रकरणी अभिषेक रघुनाथ मासये (वय 24) याला राजापूर पोलिसांनी अटक केली. त्याला शुक्रवारपर्यंत (ता. 8) पोलिस कोठडी दिली आहे.

राजापूर तालुक्‍यातील कोदवली तरळवाडीतील तुकाराम तानू मासये हे आपल्या दिव्यांग मुलासमवेत गावाला राहतात. त्यांचा नातू अभिषेक आई-वडिलांसह मुंबईत राहतो. 18 जूनला तुकाराम मासये हे मुंबईला गेले होते. ते 29 जूनला परत आले तेव्हा त्यांना घरातील कपाटे उघडी असल्याचे आढळून आले. कपाटातील बॅंकेचे पासबुक आणि एटीएम कार्ड गायब असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या बॅंक खात्यातून राजापूर, गोवा आणि मुंबई आदी ठिकाणांहून वेगवेगळ्या एटीएममधून तीन लाख चार हजार 668 रुपये काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एटीएमची "सीसीटीव्ही'चे चित्रीकरण तपासले असता त्यामध्ये मायसे यांचा नातू एटीएममधून पैसे काढत असल्याचे दिसले. पोलिसांनी मुंबई गाठून अभिषेकला ताब्यात घेतले.

संधीचा गैरफायदा
अभिषेक यापूर्वी गावाला आला असताना तुकाराम मायसे यांनी एटीएमचा पिनकोड सांगून त्याला एटीएममधून पैसे काढायला सांगितले होते. त्या वेळी सांगितलेला एटीएटमचा पिनकोड नंबर अभिषेकने लक्षात ठेवून संधी मिळताच आजोबांच्या एटीएममधून पैसे लांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. एटीएममधून काढलेल्या पैशातून त्याने नवीन मोबाईल आणि कॅमेरा अशा वस्तू खरेदी केल्या.

Web Title: rajapur konkan news grandson cheating to grandfather