शाळेतील विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

देवाचेगोठणे साड्येवाडीत एकच शिक्षक; भरतीकडे दुर्लक्ष, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

राजापूर - दोन पदे मंजूर असतानाही रिक्त असलेल्या जागेमुळे एकच शिक्षक कार्यरत असल्याने तालुक्‍यातील देवाचेगोठणे सोड्येवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दीड महिने खेळखंडोबा झाला आहे. 

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत शिक्षक मिळावा म्हणून येथील पालक पंचायत समितीचे उंबरठे झिजवले. लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले; मात्र त्यांच्याकडून ग्रामस्थांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे संतप्त पालकांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शाळेत गतवर्षीपासून एक शिक्षक पद रिक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. गतवर्षी ग्रामस्थांनी सलग दोन दिवस शाळा बंद आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन शिक्षण विभागाने एका शिक्षकाची त्या शाळेमध्ये कामगिरीवर बदली केली होती; मात्र शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षक मूळ शाळेवर हजर झाले. त्यामुळे यावर्षीही शाळेत एकच शिक्षक कार्यरत होता. प्रशासकीय कामकाजासह बैठका आणि शाळेच्या कामासाठी या शिक्षकाला वारंवार शाळा बंद करून जावे लागते. 

यावर्षी शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी शिक्षक न दिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. येथील ग्रामस्थ संजीव सोडये, बाळकृष्ण सोडये यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुरलीधर वाघाटे यांची भेट घेऊन व्यथा मांडली. त्यांनी आश्‍वासनापलीकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह पालकांनी शाळा बंदचे हत्यार उपसण्याचा 
इशारा दिला आहे.

अंतर्गत राजकारणाचा बळी? 
गेल्या पंधरा दिवसांमध्ये देवाचेगोठणे बीटमधील दोन शाळांमधील शिक्षकांची सोलगाव-केरंबेळकरवाडी आणि देवाचेगोठणे नं.१ येथे कामगिरीवर बदली झाली आहे. शिक्षण विभागाकडून देवाचेगोठणे-सोडयेवाडीतील शाळेवरच शिक्षक न देऊन अन्याय का केला जात आहे, असा सवाल पालकांनी केला आहे. पंधरा दिवसांमध्ये या बीटमधील शिक्षकांच्या झालेल्या बदल्या आणि सोडयेवाडी शाळेकडे झालेले दुर्लक्ष पाहता ही शाळा लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणाचा बळी ठरत नाही ना अशी शंका ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: rajapur konkan news only one teacher in devachegothane sadewadi school