सोडयेवाडी शाळेला मिळणार शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

राजापूर - दोन शिक्षकपदे मंजूर असूनही रिक्त जागेमुळे एकशिक्षकी झालेल्या देवाचेगोठणे-सोडयेवाडी येथील मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा दै. ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच त्याची दखल जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले यांनी दखल घेतली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी माने आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुरलीधर वाघाटे यांच्यांशी संवाद साधून येत्या दोन दिवसांमध्ये त्या शाळेत तत्काळ अन्य शिक्षक देण्याची सूचना त्यांनी दिली.

चौथीपर्यंतची शाळा असलेल्या तालुक्‍यातील देवाचेगोठणे-सोडयेवाडी येथील शाळेमध्ये दोन शिक्षक पदे मंजूर आहेत; मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ही शाळा एक शिक्षकी झाली. प्रशासकीय कामकाजासह बैठका आणि शाळेच्या कामासंबंधी सध्या हजर असलेल्या शिक्षकाला वारंवार शाळा बंद करून जावे लागते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पालकांनी अन्य एका शिक्षकासाठी शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत दैनिक सकाळने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले. गतवर्षी कामगिरी शिक्षकाच्या माध्यमातून हे पद भरण्यात आले; मात्र ते पुन्हा रिक्त होण्यास स्थानिक पातळीवरचे अंतर्गत राजकारणही कारणीभूत आहे, याचाही निर्देश वृत्तात होता. याची दखल घेऊन नागले यांनी गुरुवारी प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. वाघाटे यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी येत्या दोन दिवसांत शिक्षक देण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासूनचा रिक्त पदाचा प्रश्‍न मिटणार आहे.

Web Title: rajapur konkan news teacher to sodayewadi school