मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण हाच पर्याय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

राजापूर - राजापूर शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. ही कुत्री झुंडीने फिरत असल्याने लहान मुलांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी कुत्र्यांनी लोकांवर हल्ले केले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.  मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण हा पर्याय प्रशासनासमोर आहे; मात्र आवश्‍यक यंत्रणेअभावी अंमलबजावणी झालेली नाही.

राजापूर - राजापूर शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. ही कुत्री झुंडीने फिरत असल्याने लहान मुलांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी कुत्र्यांनी लोकांवर हल्ले केले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.  मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण हा पर्याय प्रशासनासमोर आहे; मात्र आवश्‍यक यंत्रणेअभावी अंमलबजावणी झालेली नाही.

पावसाळा असो वा उन्हाळा राजापूर शहर आणि भटकी कुत्री हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून जुळलेले आहे. शहराच्या विविध भागांसह रहदारीचे रस्ते, शाळा आदी परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सर्रास वावर असतो. ही कुत्री झुंडीने फिरत असतात. त्यांना हाकलायचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येतात. अंगणात खेळणारी लहान मुले, रस्त्यावरून जाणारी वृद्ध मंडळी, तसेच वाहनचालकांच्या अंगावरही कुत्री धावून जात आहेत. महिलांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मोकाट कुत्र्यांच्या समस्येचा मुद्दा चर्चेत आला होता. यावेळी प्रशासनाला मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना दिली होती; मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाईची पावले उचलेली नाहीत. याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

प्राणिमित्र संघटनेच्या मागणीनुसार कुत्र्यांचा छळ करणे अगर त्यांना जीवे मारण्यास कायद्याने बंधन घातले आहे. कुत्र्यांना पिंजऱ्यात पकडून बाहेर नेऊन सोडणेही आता सोपे राहिले नाही. यापैकी एक जरी कृत्य घडले आणि तक्रार झाली, तर संबंधितांवर कडक कारवाईची तरतूद केली आहे. यामुळे कायद्याला कोण अंगावर घेणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कायद्यामुळे मोकाट कुत्र्यांवरील उपाययोजनांवर बंधने आल्याचे दिसते.

अंमलबजावणीत अडचणी...
मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर निर्बीजीकरण करणे चांगला पर्याय आहे. त्यासाठी सुमारे दहा हजारांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे; मात्र त्याच्या अंमलबजावणीत काही समस्या आहेत. निर्बिजीकरणामध्ये शस्त्रक्रिया करून संबंधित कुत्र्याला सोडून दिले जाते. यानंतरच खरी समस्या उद्‌भवते. शस्त्रक्रिया केलेल्या जखमेला इन्फेक्‍शन झाल्यास कुत्र्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. निर्बीजीकरणाचा सप्ताह राबवून रोज पाच ते सात कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करायची आणि त्या कुत्र्यांवर पाळत ठेवायची. शस्त्रक्रिया केलेली कुत्री धोक्‍याबाहेर आल्यानंतर इतर कुत्र्यांचे निर्बीजीकरण करायचे ही एक पद्धत समस्येवर मात होऊ शकते.

Web Title: rajapur news dog