राजापुरात आढळले 'ऍक्‍टीयास ल्युना' फुलपाखरु

राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

तहसील इमारतीवर सापडले - अमेरीका, कॅनडा आणि मेक्‍सिकोत आढळ

तहसील इमारतीवर सापडले - अमेरीका, कॅनडा आणि मेक्‍सिकोत आढळ
राजापूर - निसर्गप्रेमींसाठी कायमच कुतुहूलाचा आणि संशोधनाचा परिसर बनलेल्या राजापूर तालुक्‍यामध्ये सलग दुसऱ्यावर्षी "ऍक्‍टीयास ल्युना‘ हे अतिशय देखणे असलेले निशाचार प्रजातीचे फुलपाखरू (पतंग) सापडले आहे. तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीवर पंधरा दिवसांपूर्वी "ऍटलस‘ हा दुर्मिळ पतंग सापडलेला असताना त्याच भिंतीवर सोमवारी (ता. 19) सायंकाळी हे फुलपाखरू सापडण्याचा दुर्मिळ योग जुळून आला. प्रामुख्याने उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारे हे फुलपाखरू सापडल्याने तालुक्‍यामध्ये विविध प्रजातीचे पक्षी आणि प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीवर बसलेला हा पतंग तलाठी श्री. शेवाळे यांना दिसला. त्यांनी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे आणि पक्षीमित्र धनंजय मराठे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ पाहणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात ठेवण्याला पसंती दिली.
 

"सॅंटरनिडी‘ कुळातील असलेल्या पतंगाचे सुमारे बारा ते पंधरा दिवसांचे जीवनमान असते. या पतंगाच्या दोन पंखांमधील अंतर साधारणतः तेरा ते सोळा सेंमी असते. त्याच्या शेपटीचा रंग आणि लांबीवर तो नर आहे की मादी याचे निदान करणे अधिक सोयीस्कर ठरते. त्याच्या पंखावर चंद्रासारखे गोल असतात. ते कलेकलेने वाढत जावून त्याचा पूर्ण चंद्र होतो. चंद्राची कला पूर्ण होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी जातो; मात्र ल्युना पतंगाच्या पंखावरील चंद्राची कला पूर्ण होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी जातो. म्हणून त्याला "ल्युना मॉथ‘ असे टोपणनाव पडले आहे. कोकणामध्ये वास्तव्यास असलेल्या ल्युना मॉथ साधारणपणे आपल्या जीवनकालामध्ये सुमारे पंचवीस झाडांवर उपजीविका करतो. प्रजनन करण्यासाठी नर आणि मादी जेव्हा शारीरीकदृष्ट्या तयार होतात मादी विशिष्ट गंध सोडतात. त्याचा दर्प वा वास साधारण चार ते अकरा किमीमध्ये राहून त्या परिसरात असलेल्या नरासोबत नंतर मादीचे मिलन होवून नवीन प्रजाती जन्मास येते. दुर्मिळ प्रजातीचे असलेले हा पतंग अमेरीका, कॅनडा आणि मेक्‍सिको देशांमध्ये प्रामुख्याने आढळतो. 2011 मध्ये जुनन्रमध्ये पिरजादेवाडा येथे प्राचीन वास्तूवरही हा पतंग आढळून आला होता. त्यातच 2010 मध्ये भारतातील आसाम येथील सोनेरी राखीव जंगलात पालाशरंजन स्वामी यांना हा पतंग आढळून आल्याचीही काही ठिकाणी नोंद आढळते.

Web Title: Rajapurata found 'Act to Lou' Butterflies

फोटो गॅलरी