
-राजेंद्र बाईत
राजापूर : अतिवृष्टीमध्ये २०२१ साली दरडी कोसळून आंबा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्या वेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येण्यासाठी राजापूर तालुक्यातून जाणारा अणुस्कुरा घाटमार्ग हा एकमेव पर्यायी मार्ग होता. त्या काळात खऱ्या अथनि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याच्यादृष्टीने अणुस्कुरा घाटाचे महत्त्व अधोरेखित झाले होते. आंबा घाटमार्ग बंद असल्याने कोल्हापूर भागातील बाजारपेठेतून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणारी सर्व मालाची आवक आणि प्रवासी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गातून सुरू होती.